सकल हिंदु समाजाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

कोल्हापूर, २५ जून – हिंदु समाजाची अस्मिता, सुरक्षा आणि धार्मिक स्वातंत्र्य यांना धोका निर्माण करणार्या गंभीर विषयांवर तात्काळ कार्यवाही व्हावी; अन्यथा १० दिवसांनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदु एकता आंदोलन, हिंदु महासभा, हिंदु जनजागृती समिती, मंदिर महासंघ, विश्व हिंदु परिषद, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, अखिल भारत हिंदु महासभा, महाराजा प्रतिष्ठान, ‘शिवशाही फाऊंडेशन’ यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनातील काही मागण्या
१. मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवा
२. शिवभक्तांवरील खोटे गुन्हे मागे घ्या
३. हिंदु धर्म, देवता, महापुरुष यांचावरील अपमानास्पद वक्तव्ये करणार्यांवर कारवाई करा
४. बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी थांबवा
५. शाळांमध्ये संस्कारवर्ग लागू करा
६. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या
(बहुसंख्य हिंदूबहुल देशात अशा मागण्या कराव्यात लागतात आणि त्यासाठी आमरण उपोषणाची चेतावणी द्यावी लागते, हे दुर्दैवी आहे ! – संपादक)
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश