
कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर संपूर्ण भारतीय सांस्कृतिक परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान आणि स्थापत्य वारसा स्मारक आहे. मंदिराच्या विविध भागांमध्ये आढळणारे शिलालेख, शिल्पपट्टिका, वास्तू अवशेष आणि स्थापत्य वैशिष्ट्ये ही केवळ धार्मिक दृष्टीकोनातून नव्हे, तर इतिहास, पुरातत्व, अभिलेखशास्त्र आणि कला इतिहास यांच्या दृष्टीनेही अनन्यसाधारण महत्त्वाची आहेत. त्यामुळे या मंदिराच्या जतन आणि संवर्धन याच्या प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय वारसा संवर्धन तत्त्वे, भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धतींचे काटेकोर पालन व्हावे, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले.
या प्रसंगी ‘हिंदु एकता आंदोलना’चे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम जरग, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र तोरस्कर, श्री. अभिजित पाटील यांसह अन्य उपस्थित होते.

१. मंदिर परिसरातील ऐतिहासिक आणि अभिलेख यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण शिलालेखांच्या संरक्षणासाठी आवश्यक तात्पुरती सुरक्षाव्यवस्था, संरक्षक आच्छादन किंवा वैज्ञानिक नोंदणी प्रक्रिया पुरेशा प्रमाणात राबवलेली दिसून येत नाही.
२. संवर्धनाच्या कामांच्या वेळी अशा शिलालेखांची अथवा मूळ स्थापत्य घटकांची हानी झाल्यास ते सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर ठरेल. त्यामुळे सदर जतन आणि संवर्धन प्रकल्प कोणत्या तांत्रिक आराखड्यानुसार, कोणत्या संवर्धन तत्त्वांच्या आधारे आणि कोणत्या तज्ञ समितीच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे ? याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी.
३. मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल, तांत्रिक आराखडा, वापरण्यात येणार्या संवर्धन पद्धती, साहित्य तसेच संवर्धनानंतरच्या अपेक्षित स्वरूपाची माहिती भाविक, अभ्यासक, वारसा संवर्धक आणि सर्वसामान्य नागरिक यांसाठी उपलब्ध करून देण्यात यावी.
४. मंदिराच्या समोरील असणार्या ‘गरुड मंडपा’चे संवर्धन करतांनाही योग्य पद्धतीने काळजी घेतलेली नसल्यामुळे त्या ‘गरुड मंडपा’चा मूळ भाग या कामादरम्यान उखडला गेला असून आजही ते काम परत करावे लागले आहे. गरुड मंडपाचा मूळ दगड उखडला गेला, तसेच या मंदिराच्या परिसरामध्ये काम करत असतांना अनेक प्राचीन मंदिरे आणि शिल्पीय अवशेष आढळून येण्याची शक्यता आहे. यांचीही योग्य ती काळजी घेण्यात यावी.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !