आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान

मुंबई – माझ्या तिन्ही पत्नींचे मी धर्मांतर केलेले नाही, त्यांपैकी २ हिंदु आणि आणि आता विद्यमान असलेली पत्नी ख्रिस्ती आहे. ख्रिस्ती पत्नीही तिचा धर्म विशेष न पाळणारी आहे, असे स्पष्टीकरण अभिनेते आमिर खान यांनी दिले आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री आणि भाजपचे हिंदुत्वाची सूत्रे उचलणारे नेते नितेश राणे यांनी आमिर खान याला ‘लव्ह जिहाद’चा ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ (एखाद्या आस्थापनाच्या किंवा उत्पादनाच्या प्रचारासाठी निवडलेली व्यक्ती) म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर त्याने वरील स्पष्टीकरण दिले आहे. (असे असले, तरी आमिर खान यांच्या सर्व मुला-मुलींची नावे ही इस्लामीच आहेत, याविषयी ते काही बोलतील का ? – संपादक)

अभिनेत्यांनी खासगी आयुष्य आणि सार्वजनिक प्रतिमा सांभाळली पाहिजे ! – नितेश राणे, मत्स्य व्यवसाय मंत्री

अभिनेते आमिर खान यांच्या स्पष्टीकरणावर मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे की, ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत; कारण लव्ह जिहादमध्ये फसवल्या गेलेल्या मुलींना अशा प्रकारे सांगितले जाते की, प्रसिद्ध अभिनेतेही तेच आहेत, तर तूही हाच मार्ग स्वीकार. ज्या वेळी एखादी व्यक्ती कोट्यवधी लोकांसाठी ‘स्टार’ बनते, तेव्हा तिने तिचे खासगी आयुष्य आणि सार्वजनिक प्रतिमा दोन्ही सांभाळले पाहिजे.