सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !

आगीवर नियंत्रण मिळवतांना अग्नीशमनदलाचे कार्यकर्ते

सोलापूर – येथील सैफुल परिसरातील वैष्णवी मंदिराजवळील अनुमाने ५० वर्षे जुन्या वटवृक्षाला लागलेली आग उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या तत्परतेमुळे आटोक्यात आल्याने मोठी हानी टळली. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अग्नीशमन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर अग्नीशमनदलाचे महासिद्ध उमराणी, पौर्णिमा रोकडे, बी.आर्. डोंगरे यांनी अथक परिश्रम घेत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवत पर्यावरणदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेला वटवृक्ष वाचवण्यात यश मिळवले.

आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी प्राथमिक स्तरावर आग विझवण्याचे प्रयत्न केले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर, तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या अग्नीशमनदलाच्या तत्पर कार्याचे कौतुक करून आभार व्यक्त केले.