|

अहिल्यानगर – श्री क्षेत्र शनिशिंगणापूर मंदिरात ११४ मुसलमान कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचार्यांनी २१ मे या दिवशी मंदिराच्या पवित्र चौथर्यावर जाऊन ‘ग्रिल’ बसवले होते, तसेच तेथील स्वच्छता आणि रंगरंगोटीही केली होती.
🛕Shani Shingnapur Devasthan Row:
114 Muslim staff were employed at the temple and later removed after protests.Yet, during this period, the following office-bearers took no action:
📌President: Bhagwat Sopan Bankar
📌Vice-President: Vikas Nanasaheb Bankar
📌General Secretary:… pic.twitter.com/ALITst1Isy— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 15, 2025
महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी यावर तीव्र आक्षेप घेत या कर्मचार्यांच्या हकालपट्टीची मागणी करत १४ जून या दिवशी मंदिराबाहेर मोर्चा काढण्याची चेतावणी दिली होती. यानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाने ट्रस्टमध्ये ११४ मुसलमान कर्मचारी काम करत असल्याची स्वीकृती दिली होती. यानंतर शनिशिंगणापूर देवस्थानाने ११४ मुसलमान कर्मचार्यांसह स्वत:च्या १६७ कर्मचार्यांना नोकरीवरून काढून टाकले.
"Shani Shingnapur temple’s bold move welcomed; Remove Mu$l!m staff from other Hindu temples too!" – Hindu Janajagruti Samiti
There was intense outrage among Hindus over Mu$l!m employees installing a grill on the sacred platform of the temple, following which the administration… pic.twitter.com/yr5x7B6Dq7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2025
मंत्री नीतेश राणे यांनीही मुसलमान कर्मचार्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. नीतेश राणे यांच्या या भूमिकेमुळे शनिशिंगणापूर देवस्थानाच्या विश्वस्त मंडळावरील दबाव वाढला होता. विश्वस्त मंडळाने म्हटले आहे की, या कर्मचार्यांपैकी एकाही मुसलमान कर्मचार्याचे काम मंदिराच्या मुख्य गर्भगृहात किंवा चबुतर्यावर नाही. हे कर्मचारी मुख्यतः शेती विभाग, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षणाशी संबंधित ठिखशणी कार्यरत आहेत. ९९ कर्मचारी मागील ५ महिन्यांपासून नोकरीवर अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचेही वेतन बंद करण्यात आले आहे. उर्वरित १५ कर्मचारी अनेक वर्षांपासून ट्रस्टमध्ये काम करत आहेत. यातील काहींचा अनुभव २० वर्षांहून अधिक आहे; पण या प्रकरणी देवस्थानावरील दबाव वाढल्यानंतर अखेर त्यांनी ११४ मुसलमान कर्मचार्यांसह एकूण १६७ जणांना कामावरून काढून टाकण्यात आले. या सर्वांवर अनियमितता आणि शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Shri Shani Shingnapur Devasthan lays off 114 Muslim employees
✊🏻Result of collective protest by Maharashtra Mandir Mahasangh and other Hindu organisations
🚩Minister Nitesh Rane had also echoed the demand
"We shall not compromise with the dignity of Hindu Dharmik places." –… pic.twitter.com/XzhqdCbIcX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2025
हिंदु धार्मिक स्थळांच्या प्रतिष्ठेशी केलेली तडजोड स्वीकारणार नाही ! – नीतेश राणे, मत्स व्यवसाय आणि बंदरे मंत्री

हिंदु संघटनांनी केलेली मागणी योग्यच आहे. हाजी अली आणि अजमेर दर्ग्यात असे कृत्य कुणी करेल का ? असे कृत्य केवळ हिंदु धार्मिक स्थळांच्या संदर्भातच का केले जाते ? हिंदु व्यक्ती मुसलमान धार्मिक स्थळांत काम करतांना दिसली, तर हे लोक त्याला सोडणार नाहीत; परंतु ज्या प्रकारे आपल्या हिंदु धार्मिक स्थळांच्या प्रतिष्ठेशी सतत तडजोड केली जात आहे, ते आपण आता कोणत्याही परिस्थितीत स्वीकारू शकत नाही.
संपादकीय भूमिकाहा हिंदूंच्या एकजुटीचा विजय आहे ! शनिशिंगणापूर देवस्थानाने हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित विरोधामुळे मुसलमान कर्मचार्यांना काढून टाकले असले, तरी त्यांना कामावर घेणार्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे ! |
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !