कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !

मुंबई – कोस्टल रोड (सागरी किनारी रस्ता) येथील बोगद्यात एका चारचाकीला आग लागली. मुंबई अग्नीशमन विभागाने ही आग तात्काळ विझवली. आग लागल्याने अनेक लोकांनी त्यांच्या गाड्या तेथेच सोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. गाड्या तेथेच अडकून पडल्याने गडबडीची स्थिती निर्माण झाली, तसेच तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. या दुर्घटनेत कुणीही घायाळ झालेले नाही. बोगद्यातील गाड्या बाहेर काढण्याचे काम चालू होते.

कोस्टल रोड म्हणजे काय ?

कोस्टल रोड हा ८ पदरी महामार्ग असून यावरून दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स ते उत्तर मुंबईतील कांदिवलीपर्यंत महामार्ग आहे. हा भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा असलेला महामार्ग आहे.

 

संपादकीय भूमिका

अशा प्रसंगात आपत्कालीन यंत्रणाही अस्तित्वात हवी !