सदाशिव पेठेत १७ जुलै या दिवशी सोहळा

पुणे, १५ जुलै (वार्ता.) – पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेकडून देण्यात येणारा ‘स्व. मोरेश्वर गोपाळ चाफेकर जीवन गौरव पुरस्कार’ ‘शिक्षण प्रसारक मंडळी’चे माजी अध्यक्ष अधिवक्ता एस्.के. जैन (सोहनलाल कुंदनमल जैन) यांना १७ जुलै या दिवशी प्रदान करण्यात येणार आहे. २५ सहस्र रुपये रोख, मानपत्र, पुणेरी पगडी आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार सोहळा सदाशिव पेठेतील ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’च्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता होईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष महादेव माने यांनी १४ जुलै या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अधिवक्ता जैन यांनी ‘खडकी शिक्षण संस्थेचे मानद अध्यक्ष’ म्हणून २५ वर्षे काम पाहिले, तसेच पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था ‘शिक्षण प्रसारक मंडळी’या संस्थेचे त्यांनी १० वर्षे अध्यक्षपद भूषवले आहे.
अधिवक्ता एस्.के. जैन हे ज्येष्ठ विधीज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. कायदेविषयक ते संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ते कार्यरत आहेत. एप्रिल २०२५ मध्ये सामाजिक आणि कायदेविषयक योगदानाविषयी त्यांचा ‘अमृतमहोत्सव’ (७५ वर्षे) साजरा करण्यात आला. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले