
तुर्भे – तुर्भे आगारात नवी मुंबई परिवहनच्या जे.बी.एम्. आस्थापनाच्या इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाशी अग्नीशमन दलाने त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे इतर गाड्यांना त्याची झळ बसली नाही. गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक बसला आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे; मात्र त्यावर ठोस उपाययोजना काढण्यात आलेली नाही. गणेश नाईक यांच्या हस्ते नवी मुंबई परिवहनच्या ५१ नवीन बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले होते.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !