|

तुळजापूर – ‘श्री तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’चे काम चालू होण्यापूर्वीच मंदिर परिसरातील २० उपदेवतांच्या मूर्ती हालवण्यात आल्या आहेत. मंदिराची रचना पालटाची कामे चालू करतांना कोणतीही योग्य ती काळजी न घेतल्याने प्राचीन श्री ब्रह्मदेवाची मूर्ती निष्काळजीपणामुळे दुभंगली आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. अनेक तक्रारी करूनही गेले अडीच महिने दोषी शासकीय अधिकार्यांवर अद्याप गुन्हे का नोंद झाले नाहीत ? दोषी अधिकार्यांवर तात्काळ गुन्हे नोंद करून कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केली.
तुळजापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महंत मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री. अमरराजे परमेश्वर कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, अधिवक्ता शिरीष कुलकर्णी, श्री. परिक्षित साळुंखे आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
अनादी काळापासून मंदिरात चालू असलेले कुलाचार, वंशपरंपरा आणि अन्य धार्मिक कृती यांसाठी कुठलीही जागा आराखड्यात न ठेवणे हे गंभीर असून ते हिंदूंच्या श्रद्धेवर आघात करण्यासारखे आहे. त्यामुळे स्थानिक पुजारी मंडळ, हिंदुत्वनिष्ठ संघटना, धार्मिक संघटना, ग्रामस्थ यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. विशेषतः गाभार्यातील सभामंडपाला तडे गेल्याने त्याचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. मंदिर रचनेत कोणतेही पालट करतांना अथवा नवीन विकास आराखडा अंतिम करण्यापूर्वी मूळ मंदिराच्या ऐतिहासिक, धार्मिक, तसेच वास्तूरचनेला कोणताही छेद दिला जाणार नाही, याची शासनाने निश्चिती देण्याची आवश्यकता आहे.
| आराखड्याविषयी स्थानिकांची मते विचारात घ्यावीत !
‘श्री तुळजापूर संरक्षण कृती समिती’, महाराष्ट्र मंदिर महासंघ, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, पुजारी मंडळ, स्थानिक ग्रामस्थ यांची एक बैठक जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी बोलवावी. या बैठकीत आराखडा आणि मंदिराच्या संदर्भातील सर्व सूत्रांविषयी चर्चा करणे आवश्यक आहे, अशी ठाम मागणीही या वेळी सर्व संघटनांनी केली. |
श्री ब्रह्मदेवाची मूर्ती आधीच भंगलेली असल्याचा दावा दिशाभूल करणारा आणि खोडसाळ आहे. पूर्वी ती मूर्ती अखंड आणि व्यवस्थित होती, त्याचे पुरावे आहेत. मूर्ती हालवतांना श्री ब्रह्मदेवाची मूर्ती दुभंगली असल्याने त्याची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे. मंदिर विकास आराखड्यात पारदर्शकता यावी, लेखी दस्तऐवज घोषित करण्यात यावेत. आराखड्याचा धार्मिक दृष्टीकोनातून आढावा घेण्यासाठी धर्मशास्त्राचे अभ्यासक, धर्माचार्य आणि शंकराचार्य पिठांचे विचार जाणून घेणे अत्यावश्यक आहे. कुलाचार, प्राचीन परंपरा, वंशप्रथा यांसाठी स्वतंत्र जागा आराखड्यात स्पष्टपणे दर्शवावी. मुख्य प्रवेशद्वार पूर्वीप्रमाणेच ठेवावे. मागून नवीन द्वार सिद्ध करून मंदिराची रचना पालटू नये, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
संपादकीय भूमिकाअशी मागणी हिंदुत्वनिष्ठ आणि धार्मिक संघटना यांना का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन स्वत:हून केव्हा पुढाकार घेणार ? आजपर्यंत हिंदूंच्या विषयी अशी उदासिनता दाखवली जाणे, हे दुर्दैवी आहे ! |
वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) बसस्थानकावर प्रवाशांच्या गैरसोयींचा ‘प्रवास’ चालूच !
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
स्वरूप महाजन यांनी महावितरण कार्यालयाच्या दारातच रात्रभर झोपून केले अनोखे आंदोलन !