
अहिल्यानगर – जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सागर बेग आणि त्यांचे बंधू शिवसेनेचे नगरसेवक आकाश बेग यांना थेट पाकिस्तानातून जिवे मारण्याची आणि घर बाँबने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. पुणे जर्मन बेकरी स्फोटातील आरोपी अस्लम जहागीरदार (ज्याची ३१ डिसेंबर २०२५ या दिवशी हत्या झाली) याच्या हत्येशी सागर बेग यांचे नाव खोट्या पद्धतीने जोडण्यात आले होते. पोलिसांनी अन्वेषणाअंती बेग यांना निर्दोष ठरवले होते; मात्र कट्टरपंथीय लोकांनी हा राग मनात धरून पाकिस्तानातील आतंकवादी टोळ्यांशी संपर्क साधला आणि बेग यांचा सूड उगवण्याची योजना आखली. ‘ट्रीनी’ या हिंदुत्वनिष्ठ ‘एक्स’ खात्याने याविषयी सर्व घटनाक्रम नुकचा उघड केला आहे.
पाकिस्तानातील ‘मोस्ट वॉन्टेड’ गुंड हम्माद मेमन, अनकरीब राणा, आबिद जट्ट आणि शहजाद भट्टी यांनी सामाजिक माध्यमांवरील व्हिडिओ आणि ‘व्हॉईस मेसेज’द्वारे (ध्वनीरूपातील संपर्कद्वारे)धमक्या दिल्या आहेत. ‘कोणतेही सरकार किंवा यंत्रणा तुला वाचवू शकत नाही, लॉरेन्स बिश्नोईसुद्धा मला घाबरतो’, अशी धमकी आतंकवादी आबिद जट्टने दिली आहे.
गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी ! – सागर बेग यांची मागणी
महाराष्ट्र पोलिसांनी उत्तरप्रदेश पोलिसांप्रमाणे गुन्हेगारांवर ठोर कारवाई करावी, अशी मागणी सागर बेग यांनी केली.
अल्पवयीन मुलाकडून करून घेतली रेकी (टेहाळणी)
२३ मे २०२६ या दिवशी नोंदणी नसलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बेग यांच्या घराची ‘रेकी’ (टेहाळणी) केली आणि छायाचित्रे थेट पाकिस्तानला पाठवली. सीसीटीव्हीमध्ये एक १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा छायाचित्रे काढतांना आढळला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मुद्दाम या कामात अल्पवयीन मुलाचा वापर करण्यात आल्याचा आरोप बेग यांनी केला आहे.
महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून ४ जणांची चौकशी !
या प्रकरणी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने श्रीरामपूर भागातून ४ संशयित तरुणांना कह्यात घेऊन त्यांची १० घंटे चौकशी केली. त्यांच्याकडून भ्रमणभाष, भ्रमणसंगणक जप्त करण्यात आले असून त्यांचे थेट संपर्क पाकिस्तानातील ‘राणा’ नावाच्या व्यक्तीशी असल्याचे उघड झाले.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani