निवडणुकांवर सहस्रो कोटी रुपयांचा खर्च आवश्यक आहे का ?

मागील लोकसभा, म्हणजे वर्ष २०१९ च्या निवडणुकीचा व्यय ६० सहस्र कोटी रुपये एवढा अवाढव्य झाला होता. त्यापूर्वीच्या म्हणजे वर्ष २०१४ मध्ये निवडणुकांवर ३० सहस्र कोटी रुपये व्यय झाला होता, म्हणजे मागील निवडणुकांच्या तुलनेत वर्ष २०१९ मधील व्यय दुप्पट झाला.

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या पक्षात किती किंमत आहे, हे माहीत आहे ! – धर्मराव बाबा आत्राम, मंत्री

वडेट्टीवार आपल्या मुलीच्या उमेदवारीसाठी १० दिवस देहली येथे बसून होते; मात्र ते उमेदवारी मिळवू शकले नाही, असे प्रतिपादन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

CPI(M) MANIFESTO : माकपच्या घोषणापत्रात भारताने अण्वस्त्रे नष्ट करून देशाला शक्तीहीन करण्याचे घातक आश्‍वासन !

अशा प्रकारचे राष्ट्राघातकी आश्‍वासन देऊन जनतेकडून मते मागणार्‍या पक्षावर बंदी घालून त्याच्या नेत्यांना कारागृहात डांबवण्याची मागणी जनतेने आतापर्यंत करणे आवश्यक होते. अशी मागणी न होणे हे भारतियांना लज्जास्पदच म्हणावे लागेल !

सातारा येथून महाविकास आघाडीच्या वतीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर !

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ येथे कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी गर्दी केली. ढोल, ताशे, तुतारी यांच्या निनादात शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.

पुणे येथे ३० वर्षांपूर्वी दुरुस्ती अर्ज देऊनही ८५ वर्षीय वॉल्टर सलढाणा यांना मतदान ओळखपत्र मिळाले नाही !

यासाठी उत्तरदायी कोण आहेत ? हे निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे महत्त्वाचे आहे.

पुणे येथे भरारी पथकाने केली ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन शासनाधीन !

पकडण्यात आलेली रक्कम एवढी आहे, तर जप्त न झालेली केवढी असेल ? निवडणूक म्हणजे पैसे वाटण्याची प्रक्रिया झाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेकडून स्फोटक पदार्थांची विक्री करणारा कह्यात !

त्यांच्याकडून स्फोटक पदार्थांच्या ४० कांड्या आणि हुंडाई क्रेटा गाडी असा २१ लाख ६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.

रश्मी बर्वे यांच्या जातवैधता प्रमाणपत्राची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली !

नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघामधील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जातवैधता प्रमाणपत्राची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रहित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारताच्या लोकसभा निवडणुकीत ‘एआय’च्या साहाय्याने चुकीची माहिती पसरवण्याची चीनची कुटील रणनीती !

चीन भारतात विविध मार्गांनी करू पहात असलेली घुसखोरी कायमची थांबवण्यासाठी देशात हिंदु राष्ट्र हवे !

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत १४ सहस्र ७५३ तक्रारी !

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातून १४ सहस्र ७५३ तक्रारी करण्यात आल्या. आतापर्यंत यांतील १४ सहस्र ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.