
कोल्हापूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी १५ एप्रिलला निवडणूक अधिकार्यांकडे आवेदन प्रविष्ट केले. दोन दिवसांपूर्वी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे घोषित केले होते; मात्र मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर त्यांनी माघार घेत धैर्यशील माने यांना पाठिंबा घोषित केला. या प्रसंगी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांसह अन्य उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीही हातकणंगले मतदारसंघासाठी आवेदन प्रविष्ट केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आवेदन प्रविष्ट केले.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)