आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे प्रकरण

कोल्हापूर – महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या समर्थनार्थ विनापरवाना रॅली आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए.वाय. पाटील यांच्यासह ४० जणांवर करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.
गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये प्रामुख्याने अविनाश पाटील, राजाराम पाटील, शिवानंद महाजन, दिनकर पाटील आदींचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए.वाय. पाटील आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी २ दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या समर्थनार्थ शहरातून रॅली काढली होती, तसेच कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला होता.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court