योग्य उपचार घेतल्यास आत्महत्येच्या विचारांना प्रतिबंध करता येतो ! – आधुनिक वैद्य सुशील गावंडे, मानसोपचारतज्ञ

भौतिक साधनांद्वारे सुख असेल अथवा नसेल, तरीही मनुष्य आत्महत्या करतो, याचे खरे कारण म्हणजे मनुष्याला न मिळणारा खरा आनंद ! हा आनंद मिळवायचा असेल, तर अध्यात्माची कास धरायला हवी.

अमरावती येथे बनावट बियाणांमुळे २०० हेक्टरवरील मिर्ची खराब !

शेकडो शेतकरी आर्थिक हानीमुळे आत्महत्या करत असतांना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे संकटग्रस्त असतांना शेतकर्‍यांना बनावट बियाणे देऊन त्यांना फसवणारी आस्थापने त्यांच्या जिवाशीच खेळत आहेत !

गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक

‘जिल्ह्यात सण उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, असा आदेश पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणेदारांना दिले आहेत.

उत्तरप्रदेश येथून हिंगोली येथे आलेल्या अष्टधातूच्या मूर्तीची स्थापना !

‘शहरात गणेशमूर्ती आल्यानंतर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी मूर्तीचे विधिवत् पूजन केले आहे. ४ फूट उंचीची असलेली अष्टधातूची मूर्ती ८५ किलो वजनाची आहे. ‘कोविड’च्या सर्व नियमांचे पालन करून शहरात मूर्ती स्थापना केली आहे.

देवानंद रोचकरी यांच्या जामीनावर १५ सप्टेंबर या दिवशी होणार सुनावणी !

धाराशिव जिल्हा न्यायालयात सुनावणीच्या वेळी रोचकरी यांनी कशाप्रकारे प्राचीन मंकावती तीर्थकुंडावर मालकी हक्क दाखवला, तसेच त्यांच्यावर आजपर्यंत असलेल्या ३५ गुन्ह्यांचा इतिहास आणि अन्य बाजू न्यायालयासमोर मांडण्यात आली.

अशास्त्रीय संकल्पना राबवून त्याद्वारे होणारी श्री गणेशमूर्तीची विटंबना रोखा !

केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करत ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘मूर्तीदान’ ही अशास्त्रीय संकल्पना राबवून त्याद्वारे होणारे जलप्रदूषण आणि श्री गणेशमूर्तीची विटंबना तातडीने रोखण्यात यावी, या मागणीचे निवेदन विविध ठिकाणी देण्यात आले.

प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – हिंदु जनजागृती समिती

प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदने देण्यात आली.

एक लाख रुपयांची लाच घेणारा साहाय्यक निरीक्षक पोलिसांच्या कह्यात !

फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास साहाय्य करण्यासाठी लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षकासह संतोष खांदवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.

गणेशोत्सवानंतर मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यात येतील ! –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्‍वासन

शिवसंग्राम आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने राज्यभरात नुकतेच मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करण्यात आले. आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली.

‘मराठीच्या भल्यासाठी’ या संस्थेची पुनर्रचना !

‘उत्तम इंग्रजीसमवेतच उत्तम मराठी आले पाहिजे’, हा भाषेचा संस्कार मुलांवर करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ही संस्था कार्य करेल’, असे कार्याध्यक्ष देशमुख यांनी या वेळी सांगितले.