मंकावती तीर्थकुंड हडप केल्याचे प्रकरण
धाराशिव – तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तीर्थकुंड हडप केल्याच्या प्रकरणी आरोपी देवानंद रोचकरी आणि त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांच्या जामीन अर्जावर आता १५ सप्टेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे. ६ सप्टेंबर या दिवशी रोचकरी बंधूंना तुळजापूर न्यायालयात न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने उपस्थित करण्यात आले होते. देवानंद रोचकरी बंधूंना १८ ऑगस्ट या दिवशी अटक केल्यानंतर त्यांना २४ ऑगस्टपर्यंत ६ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर ते २४ ऑगस्टपासून धाराशिव कारागृहात आहेत.
१. धाराशिव जिल्हा न्यायालयात सुनावणीच्या वेळी रोचकरी यांनी कशाप्रकारे प्राचीन मंकावती तीर्थकुंडावर मालकी हक्क दाखवला, तसेच त्यांच्यावर आजपर्यंत असलेल्या ३५ गुन्ह्यांचा इतिहास आणि अन्य बाजू न्यायालयासमोर मांडण्यात आली.
२. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये असलेल्या प्राचीन मंकावती कुंड येथे अवैधरित्या बांधकाम करणार्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी येथील दशावतार मठाचे महंत मावजीनाथ महाराज यांच्यासह महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकटअरण्य महाराज, संजयदादा सोनवणे, जनक कदम पाटील, सुदर्शन वाघमारे यांनी ३१ मे २०२१ या दिवशी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.