रेल्वेने प्रवास करतांना अपघात झालेल्या महिलेला रेल्वे पोलिसांकडून तातडीने वैद्यकीय साहाय्य

अशी तत्परता सर्व प्रशासकीय कामकाजात आल्यास व्यवस्था पालटायला वेळ लागणार नाही ! रेल्वे प्रशासनाने अशी तत्परता सर्व कामकाजात आणल्यास रेल्वेच्या कारभाराची प्रतिमा उंचावेल !

पुणे येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास ५ वर्षे सक्तमजुरी !

वारंवार घडणार्‍या अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेसह समाजाला नीतीवान बनवण्यासाठी साधना शिकवणेही आवश्यक आहे !

सातारा येथे खासदार आणि आमदार गटामध्ये तुंबळ हाणामारी

८ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेन्द्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्यात वाद निर्माण होऊन २ गटात तुंबळ हाणामारी झाली.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांची २४ ऑगस्टच्या मध्यरात्री जामिनावर मुक्तता !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना २४ ऑगस्टच्या मध्यरात्री महाड येथील विशेष दंडाधिकार्‍यांनी १५ सहस्र जातमुचलक्यावर जामीन संमत केला

मराठवाड्याचा सिंचनाचा प्रश्‍न सोडवा ! – जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे जयदत्त क्षीरसागर यांची मागणी

मराठवाडा हा सिंचनाविषयी मागास राहिला आहे, तसेच सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिढ्यान्पिढ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे पश्‍चिमवाहिनी नद्यांचे १३५ टी.एम्.सी. पाणी मराठवाड्याकडे आणि गोदावरी नदीच्या पात्रात वळवावे.

खरोशी (महाबळेश्‍वर) येथे रुग्णाचा उपचाराअभावी डालग्यातच प्राणत्याग !

महाबळेश्‍वर तालुक्यातील खरोशी या गावातील एका रुग्णावर उपचाराअभावी डालग्यातच (कोंबड्या कोंडण्यासाठी वेतापासून बनवलेली एक मोठी जाळी) प्राण त्यागण्याची वेळ आली.

सोलापूर येथे शिवसैनिकांकडून नारायण राणे यांच्या प्रतिमेस चपलाहार आणि जोडेमार आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नवीपेठ येथे शिवसैनिक प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे यांनी राणे यांच्या प्रतिमेस चपलाहार घातला

उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने बँक आपल्या दारी उपक्रम

लाभार्थ्यांची परवड होऊ नये म्हणून करवीर शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने बँक आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत उंचगावात १६ लाख रुपयांच्या रकमेचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.

रावेरखेडी येथील थोरले बाजीराव पेशवे यांच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासाठी योजनेची आखणी !

इतिहासाने अजेय योद्धा म्हणून गौरवलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे रावेरखेडी (मध्यप्रदेश) येथील समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार आणि विकास यांसाठी १०० कोटी रुपयांची योजना आखली आहे.

वारंवार पालटणार्‍या आरोपींमुळे अन्वेषण यंत्रणांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अन्वेषण यंत्रणा सातत्याने अन्वेषणाची दिशा आणि व्यक्ती पालटत आहेत. पुणे पोलिसांनी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी वर्ष २०१४ मध्ये आरोपी म्हणून प्रथम खंडेलवाल आणि नागोरी यांचे नाव पुढे केले.