प्रशासनाने गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – हिंदु जनजागृती समितीचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदन
कोल्हापूर, ११ सप्टेंबर (वार्ता.) – प्रशासनाने गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदने देण्यात आली.
१. जयसिंगपूर नगरपालिकेत नगर अभियंता मुबीन नदाफ यांनी निवेदन स्वीकारले.
२. जयसिंगपूर नगरपालिकेचे नगरसेवक श्री. सर्जेराव पवार यांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे यांनी निवेदन दिले. निवेदन स्वीकारल्यावर ‘‘या संदर्भात मी स्वत: पत्र देतो आणि पालिकेत आवाज उठवतो. असे करणे हा भाविकांच्या श्रद्धेशी खेळ आहे.’’, असे मत श्री. पवार यांनी व्यक्त केले.
३. निपाणी येथे नगरपालिकेत अधिकारी बाबासाहेब माने यांना आणि तहसीलदार मोहन भस्मे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. राजेंद्र गुरव आणि श्री. महेश मठपती, श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
७ तहसील कार्यालयांना ऑनलाईन निवेदन सादर
पन्हाळा, शिरोळ, राधानगरी, कागल, भुदरगड, चंदगड, गगनबावडा येथील तहसीलदारांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ई मेलद्वारे’ निवेदने पाठवण्यात आली.