पाकिस्तानच्या कारागृहातून २० भारतीय मासेमारांची सुटका

या मासेमारांना कराचीच्या लांधी भागातील मालीर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. ‘वाघा सीमेवर जाण्यासाठी मासेमारांना लाहोरला पाठवण्यात आले आहे. तेथे त्यांना भारतीय अधिकार्‍यांच्या कह्यात दिले जाईल’.

यवतमाळ येथे विनयभंग करणाऱ्यास ३ वर्षांचा कारावास !

येथील अक्षय शंकर चांदेकर (वय २४ वर्षे) याला सत्र न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली. वर्ष २०२० मध्ये पीडितेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी अन्वेषण अधिकारी कवडू चांदेकर यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात चोरून अमली पदार्थ नेणार्‍या कारागृह सुरक्षारक्षकाला अटक

कारागृहातील बंद्यांमध्ये मारहाण होणे, त्यांना भ्रमणभाष पुरवणे, अमली पदार्थ पुरवणे असे अनेक अपप्रकार उघड होतात. यावरून कारागृह पोलिसांचा कारभार ढिसाळपणे चालू आहे, हे लक्षात येते. सरकारने यासंबंधी कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे.

देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण याला ‘पॅरोल’वर सोडल्यावर मुसलमानांकडून त्याचे भव्य स्वागत

दंगलखोराचे असे स्वागत कोण करत आहे, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?

भजन स्पर्धेच्या जोडीला धर्मशिक्षण द्या !

धर्मशास्त्रानुसार हिंदूंनी कुलदेवतेची उपासना करणे आवश्यक आहे. यामुळे अंतर्मनातील अयोग्य संस्कार नष्ट होण्यास साहाय्य होते. त्यामुळे शासनाने भजने आणि अभंग स्पर्धांच्या जोडीला बंदीवानांना धर्मशिक्षण देण्याचे नियोजन करावे, सर्वांनाच धर्मशिक्षण देणे अन् कठोर शिक्षेची प्रभावी कार्यवाही करणे अपरिहार्य आहे !

केरळमध्ये दोघा भावांच्या हत्येप्रकरणी २५ जणांना जन्मठेप

केरळमध्ये दोन भावांच्या हत्येच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’च्या २५ कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा ! एका मशिदीसाठी देणगी गोळा करण्यावरून झालेल्या वादावादीनंतर दोघा जणांची हत्या करण्यात आली होती.

राज्यातील कारागृहांत क्षमतेपेक्षा सहस्रो बंदीवान अधिक !

बंदीवानांच्या अधिक संख्येमुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.  कारागृहांच्या या दयनीय स्थितीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची संख्या का वाढवत नाही ? 

इस्लाम स्वीकार किंवा २ कोटी रुपये भर, नाहीतर शिरच्छेद करू !

इस्लामी देशांतील न्यायालये कशा प्रकारचे आदेश देतात, हे लक्षात घ्या ! याविषयी भारतातील एकतरी निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी तोंड उघडेल का ?

औंध (सातारा) पोलीस ठाण्याचे कारागृह तोडून दरोडेखोर पळाले !

कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी तर दरोडेखोरांना पळून जाण्यासाठी सहकार्य  केले नाही ना ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा करायला हवी !

पॅरोलवरील ८०० बंदीवानांना कारागृहात परतण्याचा नाशिक मध्यवर्ती कारागृहाचा आदेश !

कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्याने या बंदीवानांना येत्या १५ दिवसांत कारागृहात परतावे लागणार आहे. त्याविषयीचा आदेश शासनाने काढला असून या आदेशाच्या विरोधात अनेक बंदीवानांचे अधिवक्ते न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहेत.