समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी जामीन संमत

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार आझम खान

रामपूर (उत्तरप्रदेश) – येथील समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार आझम खान यांनी आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. याचसमवेत ६ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला; मात्र या प्रकरणी त्यांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी जामीनही देण्यात आला. या शिक्षेमुळे त्यांची आमदारकी रहित होण्याची शक्यता आहे. २ वर्षांपेक्षा अधिक काळासाठी शिक्षा झाल्यास आमदारकी रहित केली जाते. आझम खान यांनी वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी भाषण करतांना पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. याविरोधात भाजपच्या कार्यकर्त्याकडून तक्रार करण्यात आल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.