हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या मुसलमान तरुणाला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत उत्तरप्रदेशमध्ये पहिली शिक्षा !

अमरोहा ( उत्तरप्रदेश ) – अफझल याने ‘अरमान कोहली’ असे हिंदु नाव सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी येथील न्यायालयाने अफझल याला ५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच ४० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ‘उत्तरप्रदेश अ‍ॅक्ट अगेन्स्ट रिलिजन प्रोहिबिशन ऑर्डिनन्स २०२०’ अंतर्गत उत्तरप्रदेशमध्ये झालेली ही पहिली शिक्षा आहे. अझफल सध्या जामिनावर बाहेर होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर अफझलला कह्यात घेऊन त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

संपादकीय भूमिका 

अशांना ५ वर्षे नाही, तर आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा झाली पाहिजे, तरच असे करण्यास कुणी धजावणार नाही’, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !