पुण्यातील उद्योजकाच्या सहकार्याने सिंगापूरमधून ८ सहस्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ३ सहस्र ५०० व्हेन्टिलेटर भारतात आणणार !

आरोग्यव्यवस्था अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्व उद्योजकांचे अभिनंदन ! सद्यस्थितीत सिंगापूर येथून आणलेल्या आरोग्य सुविधा जनतेपर्यंत पोचण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आम्ही भारतीय आणि तेथील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अतिरिक्त साहाय्य पाठवणार ! – अमेरिकेला उपरती

लवकरच आम्ही भारतातील नागरिक आणि तेथील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अतिरिक्त साहाय्य पाठवणार आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी केले आहे.

(म्हणे) ‘भारताची परिस्थिती वाईट असल्याने जगाने साहाय्य करावे !’

कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिचे नक्राश्रू ढाळत आवाहन !

(म्हणे) ‘कोरोनाच्या वाढत्या संसर्गापासून लक्ष वळवण्यासाठी भारत सीमेवर कुरापती काढू शकतो !’

भारतातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा अपलाभ घेत चीनच सीमेवर कुरापत काढू शकतो, असेच भारतियांना वाटते; मात्र ‘आम्ही तसे नाही’, असे दाखवण्यासाठी आणि जगाची दिशाभूल करण्यासाठी चीन सरकारचे मुखपत्र अशा प्रकारचा कांगावा करत आहे !

भारतात मे मासाच्या मध्यापासून प्रतिदिन ५ सहस्र कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होऊ शकतो !

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापिठाच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ने तिच्या अभ्यासात भारतात कोरोनामुळे मे मासाच्या मध्यामध्ये प्रतिदिन ५ सहस्रांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

अमेरिकेचा कोरोना प्रतिबंधात्मक लसीला आवश्यक कच्च्या मालावरील निर्यात बंदी हटवण्यास नकार

अमेरिका भारताचा मित्र असल्याचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र संकटाच्या काळात जो साहाय्य करतो, तोच खरा मित्र असतो. अमेरिकेने दाखवलेला हा कृतघ्नपणा पहाता अमेरिका भारताचा खरा मित्र होऊ शकत नाही, हे भारतियांनी कायमचे लक्षात ठेवावे !

कठीण समय येता…!

कोरोनानेे नातेसंबंधांची मर्यादा ठळकपणे अधोरेखित होत आहे. अशा कठीण काळात केवळ आणि केवळ देवच आपल्या समवेत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. शेवटी ‘कठीण समय येता, देवच कामास येतो’, हेच खरे !

कोरोनाच्या संकटात चीनकडून भारताला साहाय्य करण्याची सिद्धता !

चीनने भारताला कितीही साहाय्य करण्याच्या गप्पा मारल्या, तरी त्याच्या साहाय्याचा भारताला किती लाभ होईल, हेही पहाणे महत्त्वाचे आहे. तसेच नंतर चीनकडून ‘आम्ही संकटाच्या काळात भारताला साहाय्य केले’ असे शेखी मिरवण्याचाही प्रयत्न…..

सौदी अरेबियातील शाळेच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत यांचा समावेश !

इस्लामी देशांचे प्रतिनिधित्व करणार्‍या सौदी अरेबियासारख्या कट्टर इस्लामी देशामध्ये रामायण आणि महाभारत शिकवण्याचा निर्णय घेतला जातो; मात्र भारतात शाळांमध्ये गीता शिकवण्याचा निर्णय घेतल्यावर निधर्मीवादी थयथयाट….

क्वेटा (पाकिस्तान) येथे चिनी राजदूत असलेल्या हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ४ जण ठार

स्फोट झाला होता, त्यावेळी चिनी राजदूत आणि त्यांचे सहकारी हॉटेलमध्ये नव्हते.