इस्रायलमध्ये धार्मिक उत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४० ठार

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचे म्हटले. कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथील केल्यानंतर या कार्यक्रमासाठी १० सहस्रांहून अधिक जणांनी उपस्थिती दर्शवली होती.

बैठकीत विनामास्क सहभागी झालेल्या थायलंडच्या पंतप्रधानांकडून दंड वसूल !

बँकॉकमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. बँकॉकचे राज्यपाल असविन क्वानमुआंग यांनी पंतप्रधानांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अमेरिकेत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना मास्क लावण्याची आवश्यकता नाही !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील ट्वीट करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी इस्रायलमध्येही मास्क न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचे नियम पाळले न गेल्याने भारतात परिस्थिती बिघडली ! – जागतिक आरोग्य संघटना

भारतियांना आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शिस्त शिकवली आणि लावली नसल्यामुळेच देशात ही स्थिती निर्माण झाली आहे !

आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाला अमेरिकेची मान्यता !

पहिल्या महायुद्धाच्या वेळी म्हणजे वर्ष १९१५ मध्ये ओटोमन साम्राज्याच्या सैनिकांनी आर्मेनियन लोकांच्या केलेल्या वंशविच्छेदाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मान्यता दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचे जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू पॅट कमिन्स यांच्याकडून भारताला ३७ लाख रुपयांचे साहाय्य !

‘आयपीएल्’च्या माध्यमातून, तसेच एरव्हीही शेकडो कोटी रुपये कमावणार्‍या भारतीय क्रिकेट खेळांडूंनी असे साहाय्य घोषित केल्याचे ऐकिवात नाही.

 भारतातील कोविड चाचणी विश्‍वासार्ह नाही ! – ऑस्ट्रेलिया

 भारतात होणार्‍या कोरोना चाचणीत त्रुटी असावी अथवा विश्‍वास करण्याजोगी नसावी, असे पश्‍चिम ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर मार्क मॅक्गोवन यांनी म्हटले आहे.

कोरोना महामारीसारख्या कठीण काळात आयपीएल् क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे अर्थहीन ! – ब्रिटनचे पत्रकार पिअर्स मॉर्गन

जे एका ब्रिटीश पत्रकाराला कळते, ते भारतातील सरकारी यंत्रणांना का कळत नाही ? देशातील एकही क्रिकेटपटू किंवा क्रीडाक्षेत्रातील व्यक्ती याविषयी बोलत नाही, हे लक्षात घ्या !

भारतातील परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक ! – जागतिक आरोग्य संघटना

डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, भारतात पोलियो आणि क्षयरोग यांच्या विरोधात काम करत असलेले २ सहस्र ६०० तज्ञ कोरोनाविरोधात काम करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक मार्गाने साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे.

जगात २० वर्षांत नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये कोरोना तिसर्‍या क्रमांकावर !

जगातील २१९ देशांत कोरोनाचा संसर्ग असून गेल्या १६ मासांत ३० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २ दशकांत नैसर्गिक आपत्तींत जेवढे एकूण बळी गेले, त्यापेक्षा अधिक मृत्यू कोरोनामुळे झाले असल्याचे समोर आले आहे.