(म्हणे) ‘कोरोनाच्या वाढत्या संसर्गापासून लक्ष वळवण्यासाठी भारत सीमेवर कुरापती काढू शकतो !’

चीनच्या सरकारी दैनिकाचा कांगावा !

भारतातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा अपलाभ घेत चीनच सीमेवर कुरापत काढू शकतो, असेच भारतियांना वाटते; मात्र ‘आम्ही तसे नाही’, असे दाखवण्यासाठी आणि जगाची दिशाभूल करण्यासाठी चीन सरकारचे मुखपत्र अशा प्रकारचा कांगावा करत आहे !

बीजिंग (चीन) – भारतामध्ये कोरोना महामारीमुळे स्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे भारत त्याची जुनी नीती अवलंबू शकतो. कोरोनाच्या स्थितीपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भारत सीमेवर चीन किंवा पाकिस्तान यांच्या कुरापती काढू शकतो, असा कांगावा चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने केला आहे.