कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिचे नक्राश्रू ढाळत आवाहन !ग्रेटा थनबर्ग हिला भारताविषयी एवढेच ममत्व वाटत असेल, तर तिने भारतात देशविघातक शक्ती करत असलेल्या शेतकरी आंदोलनाला दिलेला पाठिंबा मागे घ्यावा आणि भारतियांची क्षमा मागावी ! या प्रकरणात जागतिक स्तरावर तिची प्रतिमा मलीन झाल्यामुळे स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी ती असे आवाहन करण्याचे नाटक करत आहे, हे भारतीय ओळखून आहेत ! |
नवी देहली – भारत सध्या कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेतून जात आहे. यामुळे देशात ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आदींची कमतरता भासत आहे. त्यामुळे जगाने पुढाकार घेत कोरोनाच्या लढाईत संघर्ष करणार्या भारताला साहाय्य केले पाहिजे, असे फुकाचे आवाहन स्विडन येथील कथित पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने ट्वीट करून केले आहे. काही मासांपूर्वी १८ वर्षीय ग्रेटाने ट्वीट करून भारतातील राष्ट्रविघातक शक्तींकडून केल्या जाणार्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसे करतांना तिने एक ‘टूलकिट’ (आंदोलन करतांनाचे टप्पे) शेअर केले होते. यावरून जगभरातील भारतद्वेषी शक्ती या कथित शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे तिच्यावर टीका झाली होती.