इस्रायलमधील नेतान्याहू राज संपुष्टात; नफ्ताली बेनेट नवे पंतप्रधान !

बेनेट यांच्या आघाडीचा केवळ १ मताने विजय !

ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने ७ सहस्र ३०० रुपयांचा दंड !

भारतात अशी कारवाई कधीच होऊ शकत नाही, असेच जनतेला वाटेल !

अलगीकरणाचे नियम न पाळल्याने पाकने भेट म्हणून पाठवलेले आंबे स्वीकारण्यास अनेक देशांचा नकार !

पाकची जगभरात नाचक्की ! ‘पाकची आतंकवादी वृत्ती पहाता तो आंब्यांच्या नावाखाली बॉम्ब पाठवण्याच्या भीतीमुळे तर या देशांनी पाकचे आंबे स्वीकारण्यास नकार दिला नाही ना ?’, असे कुणाला वाटल्यास चूक काय ?

यंदाही हज यात्रेला अन्य देशांतील नागरिकांना येण्यास सौदी अरेबियाकडून बंदी !

असे आहे, तर केरळमधील हज यात्रेकरूंना प्राधान्याच्या सूचीत घेऊन त्यांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केरळ सरकार रहित करील का ?

विदेशी कलाकारांमध्ये ‘अनुगच्छतु प्रवाह’ हा संस्कृत शब्द अंगावर ‘टॅटू’ म्हणून गोंदवून घेण्याची चढाओढ !

कुठे संस्कृतकडे आकर्षित होणारे पाश्‍चात्त्य कलाकार, तर कुठे इंग्रजीची गुलामी करणारे बहुतांश भारतीय कलाकार !

मालदा (बंगाल) येथील बांगलादेश सीमेवरून चिनी गुप्तहेराला अटक  

अशा गुप्तहेरांविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

बांगलादेशात इस्लामी कट्टरवाद्यांकडून ‘बांगलादेश हिंदु संघटने’च्या नेत्याची हत्या !

बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू ! सरकार याविषयी बांगलादेशकडे किमान शाब्दिक निषेध तरी नोंदवणार का ?

इस्रायलच्या गोळीबारात पॅलेस्टाईनचे २ सुरक्षा अधिकारी ठार

ठार झालेले अधिकारी पॅलेस्टाईन सैन्याच्या गुप्तचर विभागाचे सदस्य असल्याचे समोर आले आहे. इस्रायलच्या सैन्याने या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

कुलभूषण जाधव यांना वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची संमती देणार्‍या विधेयकाला पाकिस्तानच्या संसदेची मान्यता

आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तान झुकले; कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा
पाकने कुलभूषण जाधव यांना वर्ष २०१६ मध्ये केली होती अन्याय्य अटक !

मुलांनी विदेशी चित्रपट पाहिला, विदेशी कपडे घातले, तर पालकांना मृत्यूदंडाची शिक्षा !

विदेशी चित्रपट पाहिल्यास आणि विदेशी कपडे घातल्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल, अशी घोषणा उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी केली आहे.