इस्रायलमधील नेतान्याहू राज संपुष्टात; नफ्ताली बेनेट नवे पंतप्रधान !

बेनेट यांच्या आघाडीचा केवळ १ मताने विजय !

(डावीकडे) नवे पंतप्रधान नफ्ताली बेनेट (उजवीकडे) माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

जेरुसलेम – लढवय्या इस्रायलचे सलग १२ वर्षे पंतप्रधानपद भूषवलेले पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना शेवटी सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. ‘क्नेसेट’कडून (इस्रायलच्या संसदेकडून) १३ जून या दिवशी यामिना पक्षाचे प्रमुख नफ्ताली बेनेट यांची इस्रायलचे नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. बेनेट यांचे डावे, उजवे आदी पक्षांचे आघाडी सरकार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये एक अरब पक्षाचाही समावेश  आहे. इस्रायलच्या इतिहासात प्रथमच एक अरब पक्ष सत्तास्थानी आला आहे. ६० विरुद्ध ५९ अशा केवळ एका मताने नव्या आघाडीने विजय मिळवला.