मुलांनी विदेशी चित्रपट पाहिला, विदेशी कपडे घातले, तर पालकांना मृत्यूदंडाची शिक्षा !

उत्तर कोरियामध्ये हुकूमशहा किम जोंग उन यांचा तुघलकी आदेश !

प्योंगयंग (उत्तर कोरिया) – विदेशी चित्रपट पाहिल्यास आणि विदेशी कपडे घातल्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल, अशी घोषणा उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी केली आहे. तसेच एखाद्याजवळ अमेरिकी, जपानी किंवा दक्षिण कोरिया यांचे व्हिडिओ आढळले, तर त्यालाही मृत्यूदंड दिला जाईल, असा आदेशही देण्यात आला आहे. या आदेशानुसार जर कर्मचारी दोषी आढळला, तर कारखाना प्रमुखाला शिक्षा होईल. मुलाने वरील कृती केली, तर त्याच्या आई-वडिलांना शिक्षा केली जाईल.


१. किम जोंग उन यांनी नुकतेच सरकारी माध्यमांना एक पत्र लिहिले आहे. यात देशातील तरुणांना आवाहन करण्यात आले आहे की, तरुणांमधील अप्रिय, व्यक्तिवादी आणि समाजविरोधी वर्तनाविरोधात मोहीम राबवा.

२. शेजारील दक्षिण कोरियातील लोकांचे म्हणणे आहे की, ‘किम जोंग यांना वाटते की, एखाद्या दुसर्‍या देशाची संस्कृती उत्तर कोरियात आली, तर तेथील तरुण किम जोंग यांच्या विरोधात उभे रहातील आणि हुकूमशाहीचा विरोध करतील. यामुळे हा कायदा लागू करण्यात आला आहे.’