सोलापूरमध्ये एकाच रात्री बनशंकरी मंदिर आणि जगदंबा मंदिर येथे चोरी !

येथील शेळगी परिसरातील बनशंकरी मंदिर आणि जगदंबा मंदिर येथे पहाटे चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीसह देवीचे अलंकार चोरले. २ मेच्या पहाटे शेळगी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, याचा अपलाभ घेऊन ही चोरी झाली.

पुणे येथील नाना पेठेमधील शितळादेवीच्या मंदिरात चोरी !

पुणे शहरातील नाना पेठेतील समर्थ कॉम्पेक्स मधील शितळादेवी मंदिरात २४ एप्रिलच्या मध्यरात्री चोरीची घटना घडली. चोरांनी देवीच्या गाभार्‍यात प्रवेश करत देवीचा चांदीचा मुकुट आणि दानपेटीतील पैसे अन् सीसीटीव्हीचा व्हीडीआर् असा ऐवज चोरून नेला.

कर्नाटकातील प्रमुख मंदिरांसह अन्य मंदिरांच्या १७६ ठिकाणच्या भूमींवर भूमाफियांचे नियंत्रण !

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण आणि नंतर मंदिरांच्या भूमीवर होणारे अतिक्रमण या दोन्ही गोष्टींपासून मंदिरांना मुक्त करण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हाच एकमेव उपाय आहे, हे भाविकांनी लक्षात घ्यावे !

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आणि मंदिरावर आक्रमण

मुसलमानबहुल देशांतील असुरक्षित हिंदू ! याउलट बहुसंख्य हिंदूंच्या देशात अन्य धर्मीय नेहमीच सुरक्षित असतात, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी लक्षात घेणार ?

अन्य प्रार्थनास्थळे नाहीत, तर केवळ हिंदूंची मंदिरे सरकारच्या कह्यात ! – अधिवक्ता अंकुर शर्मा, जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय, देहली

भारतीय राज्यघटनेतील कलम २६ प्रमाणे भारत सरकारला सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांना अधिग्रहित करण्याचे अधिकार असतांना आजवर केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेतली आहेत.

हिंदूंचे मर्यादित यश !

आज विविध राज्यांतील सरकारांनी मंदिरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा सपाटा लावला असतांना रावत यांनी मुख्यमंत्री झाल्याच्या अवघ्या एका मासात मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची केलेली धडाकेबाज घोषणा सुखद आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ११.४.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

चोरट्यांनी देवळातील चोरलेल्या घंटा परत केल्या !

सामूहिक प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे, हेच यातून स्पष्ट होते ! बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी यांना प्रार्थनेचे महत्व काय कळणार !

देवस्थाने सरकारी कचाट्यातून मुक्त होईपर्यंत हिंदू संपूर्णपणे स्वतंत्र नाहीत ! – अधिवक्ता किरण बेट्टदापूर, कर्नाटक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय

कर्नाटकमधील एकट्या कोल्लूर मूकम्बिका देवस्थानात २२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, तर इतर ४ लाख देवस्थानांत किती रुपयांचा घोटाळा झाला असेल ?, याचा विचार करता येणार नाही.

ब्रिटीश काळातील कायदे कालबाह्य ठरवून मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्या ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, प्रज्ञा भारती, तेलंगाणा

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आलेल्या कोणत्याही सरकारने ‘एंडोव्हमेंट’ कायदा मध्ये पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच आज श्री शैलम् अथवा तिरुमला तिरुपति देवस्थानची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे