हिंदु राष्ट्र घोषित करून मगच सरकारने मंदिरांची व्यवस्था चालवावी ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

भारतात ‘सेक्युलरवाद म्हणजे हिंदुत्वाचा विरोध’ अशी व्याख्या झाली आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी कार्य करत असाल, तर तुम्हाला ‘कट्टरतावादी, संघी’ असे म्हटले जाते.

छपरा (बिहार) येथे २ वर्षांपूर्वी चोरी झालेल्या कोट्यवधी मूल्याच्या २ मूर्ती अज्ञातांनी केल्या परत !

वर्ष २०१२ मध्ये चोरट्यांनी तत्कालीन पुजार्‍याला बांधून मंदिरातील ३ मूर्ती चोरून नेल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये पुन्हा या मंदिरातून ३ मूर्ती चोरी झाल्या होत्या. त्यातील २ आता परत करण्यात आल्या आहेत.

सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे !

मंदिरे सरकारच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्टाचार होतो.

सर्व भक्तांनी मंदिर रक्षणासाठी पुढाकार घ्यावा ! – सी.एस्. रंगराजन, प्रमुख पूजक, चिल्कूर बालाजी मंदिर, भाग्यनगर, तेलंगाणा

आज प्राचीन मूर्तीपूजेची परंपरा, हिंदूंचा धर्म आणि विश्वास यांवर आघात होत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन धर्मरक्षणाचा संकल्प करायला हवा.

कानपूर (उत्तरप्रदेश) मंदिरांची भूमी बळकावून त्यावर बिर्याणीची दुकाने थाटल्याचे  उघड !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना त्यांच्या श्रद्धास्थानांचे मूल्य नाही ! त्यामुळेच ते असे प्रकार चालू देतात ! ‘अशांना संकटकाळी भगवंताने तरी का वाचवावे ?’ असा प्रश्‍न कुणाच्या मनात आल्यास त्यात चूक ते काय ? असे प्रकार कधी अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात घडतात का ?

मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

सरकार मुसलमानांच्या भूमींसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे आणि हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी मात्र लुटल्या जात आहेत.

दळणवळण बंदीच्या काळात पुणे येथील ७ मंदिरांमध्ये चोरी

भाविकांनी भक्तीभावाने आणि श्रद्धापूर्वक अर्पण केलेले धन अगदी सहजरित्या चोरट्यांच्या खिशात जाते, हे संतापजनक नाही का ? प्रत्येक हिंदू खर्‍या अर्थाने धर्माभिमानी झाल्यास मंदिरांकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही.

पुणे येथील मंदिरातून दानपेटीसह दीड लाख रुपयांची चोरी

गुरुवार पेठ परिसरात असलेल्या श्री आदेश्‍वर महाराज मंदिर ट्रस्टच्या गोटीवालाधडा या मंदिरामधील नाकोडा भैरव जैन मंदिरातून १६ मेच्या रात्री २ चोरांनी दानपेटीसह १ लाख ५३ सहस्र रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे हनन म्हणजे नियोजित षड्यंत्रच ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आंध्रप्रदेशात सरकार मंदिरांचे कोट्यवधी रुपये घेते, तर ते मंदिरांना सुरक्षा का पुरवत नाहीत ? दोनशेहून अधिक मंदिरांत एकाच पद्धतीने आघातांच्या घटना घटतात, तेव्हा ते हिंदूंच्या श्रद्धांचे हनन करण्याचे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे सरकारला का कळत नाही ?

करीमगंज (आसाम) येथील मंदिरात दरोडा टाकणार्‍या १२ धर्मांधांच्या टोळीला अटक !

धर्मांधांची लुटारू टोळी धनाढ्य इस्लामी संघटनांची कार्यालये किंवा मशिदी यांठिकाणी दरोडा टाकत नाहीत, तर मंदिरांवर दरोडा घालतात. यातून त्यांची धर्मांधता दिसून येते !