पुणे येथील नाना पेठेमधील शितळादेवीच्या मंदिरात चोरी !

देवीचा चांदीचा मुकुट चोरला

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – शहरातील नाना पेठेतील समर्थ कॉम्पेक्स मधील शितळादेवी मंदिरात २४ एप्रिलच्या मध्यरात्री चोरीची घटना घडली. चोरांनी देवीच्या गाभार्‍यात प्रवेश करत देवीचा चांदीचा मुकुट आणि दानपेटीतील पैसे अन् सीसीटीव्हीचा व्हीडीआर् असा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी भरत कोटा (समर्थ कॉम्प्लेक्स, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.