पुणे येथे समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांवर गुन्हा नोंद !

महाआरती करून दिशाभूल करणारी पत्रके वाटून २ समाजात तेढ, द्वेष निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

कुतुबमिनार परिसरातील मशीद आणि मंदिर यांच्या वादाविषयी देहलीतील न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

ही याचिका भगवान विष्णु आणि जैन देवता यांच्या वतीने प्रविष्ट करण्यात आली आहे.

साईबाबांच्या मंदिराची आतंकवाद्यांनी पहाणी केली नसल्याचे नगर पोलिसांचे स्पष्टीकरण !

शिर्डी, तसेच नगर जिल्ह्यात आतंकवाद्यांनी पहाणी केल्याचा कुठलाही प्रकार घडलेला नाही. यासंदर्भात संबंधित सर्व तपासयंत्रणांकडून माहिती घेण्यात आली आहे, असे नगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सांगितले.

शिर्डीतील साईबाबा मंदिरात बाँबस्फोट घडवण्याचा आतंकवाद्यांचा कट !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदूंच्या मंदिरांवरील आतंकवादाचे सावट कायमचे दूर   होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

निर्धारित ध्वनीपेक्षा मोठ्या आवाजात आरती करणार्‍या बेंगळुरू येथील काही मंदिरांना आवाज न्यून करण्याची धर्मादाय विभागाची नोटीस !

मंदिरांना नोटीस बजावणार्‍या धर्मादाय विभागाने मशिदींना नोटीस बजावली नाही, हे लक्षात घ्या !

कोरोनामुळे कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याच्या रागातून बिर्ला मंदिरातील राहू आणि केतु यांच्या मूर्तींची तोडफोड

हिंदूंना आतापर्यंत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे ! साधनेमुळे प्रत्येक व्यक्तीला जन्म, मृत्यू, प्रारब्ध, जीवनाचा उद्देश आदींचे ज्ञान होते आणि तो सर्व सुख-दुःखांवर मात करून आनंदी राहू शकतो !

धर्माबाद (नांदेड) येथील श्रीराम मंदिरातील प्राचीन मूर्ती आणि दागिने चोरट्याने परत पाठवले !

२३ दिवसांनी चोरट्याने स्वत:हून चोरलेल्या मूर्ती आणि दागिने पार्सलने मंदिरातील पुजार्‍यांच्या घरी परत पाठवले. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

कैमूर (बिहार) येथे रेल्वे पोलीस ठाण्याच्या आवारातील श्री महाकालीदेवीच्या मंदिरात चोरी !

रेल्वे पोलीस ठाण्याच्या आवारात चोरटे चोरी करतात, हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस रेल्वेच्या संपत्तीचे कसे संरक्षण करत असतील, याची कल्पानाच करता येत नाही !

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! – वरिष्ठ अधिवक्ता किरण बेट्टादपूर, सर्वाेच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालय

सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या आर्थिक ताळेबंदांमध्ये घोळ ! जर सर्व धर्म समान असतील, तर केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का ? मंदिरांची सरकारच्या तावडीतून मुक्तता करण्यासाठी ‘मंदिरे सोडा’ अभियान राबवण्याची आवश्यकता आहे.

‘काशी-मथुरा’ मंदिरांसारख्या प्राचीन धार्मिक स्थळांच्या मुक्तीसाठी केंद्रसरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा हिंदुविरोधी कायदा रहित करावा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय आणि प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदूंनाही समान न्याय, धार्मिक अधिकार मिळायलाच हवा.