विविध मागण्यांसाठी २ जानेवारीपासून ‘मार्ड’च्या वतीने संपाची चेतावणी

राज्यभरातील ५ सहस्रांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी ‘मार्ड’च्या (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर’च्या) वतीने संपाची चेतावणी देण्यात आली आहे. संपाला बंधपत्रित डॉक्टरांच्या संघटनेनेही पाठिंबा दर्शवला आहे.

भारतातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात उघडपणे चालणारी लूट !

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढे स्वतः भरलेले भरमसाठ देणगीमूल्य वसूल करण्यासाठी रुग्णांची लूट करतात.

पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती स्थिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी देहलीहून त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कर्णावती येथे पोचले आणि रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू

चॉकलेट घशात अडकल्याने कोडोली परिसरातील शर्वरी सुधीर जाधव या १ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. शर्वरीला एका मुलीने जेलीचे चॉकलेट खाण्यास दिले. तिने चॉकलेट खाल्ल्यानंतर ती खोकू लागली. नंतर ती बेशुद्ध पडली.

सातारा जिल्हा रुग्णालयात २ गटांमध्ये तुंबळ हाणामारी !

येथील जिल्हा रुग्णालयात २५ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता २ गटांत तुंबळ हाणामारी झाली. २७ क्रमांकाच्या खोलीत उपचार घेणार्‍या २ रुग्णांना बाहेर ओढून मारहाण करण्यात आली. या हाणामारीत ५-६ जण गंभीर घायाळ झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्पर्श रुग्णालयात अपव्यवहार !

स्पर्श रुग्णालय आणि प्राथमिकदृष्ट्या दोषी असलेले संबंधित अधिकारी यांची चौकशी चालू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना दिली.

राज्यात लवकरच मेडिकल बोर्डच्या माध्यमातून ४ सहस्र ५०० जागा भरणार ! – गिरीश महाजन, आरोग्यमंत्री

भरतीमध्ये आधुनिक वैद्यांची ३०० पदे भरली जाणार आहेत. ‘एम्.पी.एस्.सी.’मधून पदभरतीस वेळ लागतो. त्यामुळे ही भरती करण्यासाठी सरकार ‘मेडिकल बोर्ड’ सिद्ध करणार आहे.

अधिष्ठाता आणि संबंधित आधुनिक वैद्य यांची विभागीय चौकशी करणार ! – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

मुंबई, पुणे, संभाजीनगर अशा मोठ्या शहरांतील सर्व शासकीय रुग्णालयांत येणार्‍या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे सर्व रुग्णांना व्हेंटिलेटर देणे अशक्य असते. तरीही ते देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.

घाटकोपर येथील इमारतीला आग

घाटकोपर येथील पंतनगर भागातील ‘विश्वा ब्लॉक’ या इमारतीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे भीषण आग लागली आणि इमारतीची दुरवस्था झाली.

नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय !

खाटा वाढवल्यानंतर नियमानुसार मनुष्यबळही वाढवायला हवे होते; मात्र कर्मचार्‍यांची रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरली गेली नाहीत.