गडचिरोली येथे आंबाडीची भाजी खाल्ल्याने २२ विद्यार्थ्यांना उलट्या !

विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून वैद्यकीय पडताळणीनंतर यातील १८ विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.

बल्लारपूर रेल्वे दुर्घटनेत दोघांचा मृत्यू !

जिल्ह्यातील बल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा ‘प्री कास्ट स्लॅब’चा भाग तुटल्याने १३ प्रवासी रेल्वे रुळांवर कोसळले. या दुर्घटनेत शिक्षिका नीलिमा रंगारी (वय ४८ वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर इतर १२ जणांवर उपचार चालू आहेत.

विपरीत परिणाम करणार्‍या औषधांचे समाजात झालेले वितरण थांबवण्याची यंत्रणाच प्रशासनाकडे उपलब्ध नाही !

अधिकार्‍यांनी मान्य केले आहे की, एखादे औषध घातक ठरले, तर त्याचा पुरवठा आणि वितरीत केलेले औषध तात्काळ थांबवण्याच्या प्रक्रियेवर प्रशासनाचे नियंत्रण नाही.

रुग्णालयात रुग्णांना साधना शिकवणारे आणि भगवान श्रीकृष्णाचे अनुसंधान अनुभवणारे नगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. रवींद्र भोसले !

‘डॉ. भोसले हॉस्पिटल’ हे देवाने मला साधना करण्यासाठीचे माध्यम म्हणून माझ्यासाठी उभारले आहे’, असे मला वाटते. देव आपला पिता आहे. त्यानेच आपल्याला निर्माण केले आहे. त्यामुळे देवाने अनेक वेळा मला ‘जे आपल्यासाठी आवश्यक असते, तेच देव आपल्याला देत असतो’, याची प्रचीती दिली आहे.

शवागारातील वातानुकूलन यंत्र बंद पडल्याने मृतदेह कुजून परिसरात दुर्गंधी !

येथील जिल्हा रुग्णालयातील शवागाराची वातानुकूलित यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे अनेक मृतदेह कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नायर, शीव, ‘के.ई.एम्.’ आदी रुग्णालयांत मांजरांच्या वावरामुळे रुग्ण त्रस्त !

‘भिंतींवर सूचना लिहिल्या, म्हणजे स्वतःचे दायित्व संपले’, असे प्रशासनाने समजू नये ! प्राण्यांना रुग्णालयात अटकाव करण्यासाठी रुग्णालय प्रशासनानेच कृतीच्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत !

सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील एम्.आर्.आय. यंत्र १ सप्ताहापासून बंद !

आरोग्य प्रशासनाने रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन समस्येवर तत्परतेने उपाययोजना काढणे आवश्यक आहे.

संभाजीनगर येथे शस्त्रक्रियेनंतर मुलगी शुद्धीवर न आल्याने कुटुंबियांकडून रुग्णालयाची तोडफोड !

अशा घटनांमधून समाजाचा संयम संपत चालला आहे, हे लक्षात येते. समाजाची नीतीमत्ता आणि संयम वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार रुग्णालयात भरती !

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे येथील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ते २ नोव्हेंबरपर्यंत रुग्णालयात उपचार घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.

रुग्णालयात परिचारिकेला एकटे पाहून ४ जणांनी केला सामूहिक बलात्कार !

राज्यातील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात असलेल्या एका रुग्णालयात परिचारिकेला एकटे पाहून ४ वासनांधांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. परिचारिकेचे सहकारी दिवाळीनिमित्त सुटीवर गेले होते. त्यामुळे ती एकटीच रुग्णालयात काम करत होती.