खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्णखाटांची संख्या दुप्पट केली !

कर्करोग रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्ण खाटा आणि त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जीन्स, टी-शर्ट, बॅकलेस टॉप, स्कर्ट, मेकअप आदींवर बंदी

महिला कर्मचार्‍यांना जड दागिने घालण्यावर, मेकअप करण्यावर आणि नखे वाढवण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहे. या नियमांचे पालन न करणार्‍या कर्मचार्‍यांवर कर्तव्यावर अनुपस्थित मानून कारवाई करण्यात येणार आहे.

नागपूर येथे परिचारिकांनीच केली शासकीय रुग्‍णालयाची पोलखोल !

प्रशासनाने एका रात्रीत सिद्ध केला नवीन प्रभाग !

चंद्रपूर येथे मांसाहार खाल्ल्याने ११ विद्यार्थ्यांना विषबाधा !

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणार्‍या चेक बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची २० जानेवारी या दिवशी सहल एके ठिकाणी गेली होती. सहलीत एकूण ५२ विद्यार्थी होते. त्यांना बॉयलर चिकन दिल्याने त्यातील ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.

नागपूर येथे घरासमोरील वाहनतळावरून झालेल्‍या वादातून तरुणाचा खून !

घरासमोर मॅक्‍सी वाहन ठेवण्‍याच्‍या कारणामुळे २ गटांत झालेल्‍या वादातून हाणामारी झाली. यामध्‍ये योगेश धामने (वय १८ वर्षे) या तरुणाचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी रामभाऊ शाहू आणि मोनू रायतदार (वय २२ वर्षे) घायाळ झाले असून त्‍यांच्‍यावर रुग्‍णालयात उपचार चालू आहेत.

१५ जानेवारीला ‘सिद्धगिरी हॉस्पिटल’ येथे अत्याधुनिक ‘एम्.आर्.आय.’ आणि ‘कॅथ-लॅब’चा लोकार्पण सोहळा ! – डॉ. शिवशंकर मरजक्के, रुग्णालयाचे संचालक

‘‘आता ही सेवा रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वानुसार इतरत्र असणार्‍या सध्याच्या प्रास्ताविक दरापेक्षा ४० टक्के अल्प दरात आणि २४ घंटे उपलब्ध !’’

वाय.सी.एम्. रुग्णालयातील ‘ओ.सी.टी.’ यंत्र खरेदीची चौकशी करावी ! – आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस  

महापालिकेच्या ‘यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालया’त रुग्णांचे डोळे पडताळण्यासाठी भांडार विभागाने ‘ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी’ (ओ.सी.टी.) यंत्राची खरेदी करतांना घोटाळा झाला. या घोटाळ्याची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आणि त्याची चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत.

कानपूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने ९ दिवसांत १३० जणांचा मृत्यू !

रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेने आकडा वाढला आहे. या आकड्याने सगळेच हैराण आहेत. आतापर्यंत कधी एवढे मृत्यू झाले नव्हते. कोरोनानंतरचा प्रभाव आणि सर्दी यांचे घातक मिश्रण बनत आहे.

नाशिक महापालिकेच्या माजी वैद्यकीय अधीक्षक दांपत्यासह ९ आधुनिक वैद्य आणि ११ जण यांवर खटला प्रविष्ट !

अवैध सोनोग्राफीचा व्यवसाय केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी आणि त्यांची पत्नी यांच्यासह ९ आधुनिक वैद्य आणि ११ जण यांच्यावर नाशिक महापालिकेने नाशिक रोड न्यायालयात खटला प्रविष्ट केला आहे.

मागण्या मान्य न केल्यास अत्यावश्यक सेवा बंद करण्याची ‘मार्ड’ची चेतावणी !

संभाजीनगर येथील निवासी आधुनिक वैद्याच्या संपाचा दुसरा दिवस !