पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती स्थिर

डावीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मातोश्री हिराबेन मोदी

कर्णावती (गुजरात) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी देहलीहून त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कर्णावती येथे पोचले आणि रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. हिराबेन यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी जून मासामध्ये हिराबेन यांनी त्यांचा १०० वा वाढदिवस साजरा केला.