‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लोकार्पण !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण झाले. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते.

नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यामागे षड्यंत्र ! – डॉ. अमित थडानी, शल्य चिकत्सक, समाजसेवक तथा लेखक

सनातन संस्था लोकांना संघटित करते. त्यामुळे तिला नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये लक्ष्य करण्यात आले. या प्रकरणांमध्ये खरे मारेकरी शोधण्याचा प्रयत्न न करता अन्वेषण करण्यात आले.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या धर्मकार्यासाठी असे योगदान द्या !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत संस्था, संघटना आणि संप्रदाय यांच्या उपक्रमांत प्रतिदिन १ घंटा सहभागी व्हा ! हिंदु राष्ट्राविषयी जनजागृती आणि विचार प्रसारित करा !

समस्त हिंदूंसाठी आश्वासक ठरणारा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !

हिंदु राष्ट्राची संकल्पना ही कोणतीही प्रादेशिक राष्ट्रवादाची संकुचित संकल्पना नाही. ते आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृतीचे आणि सनातन धर्मातील विश्वदर्शनाचेच नाव आहे. त्यामुळे ‘सनातन भारत’ म्हणा, ‘हिंदु राष्ट्र’ म्हणा कि ‘वैश्विक हिंदु राष्ट्र’ म्हणा, या सर्वांचा अर्थ एकच आहे….

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिदिन प्रार्थना करा !

१. हिंदूंनो, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज आदींप्रमाणे आदर्शरित्या राज्य करणार्‍या राज्यकर्त्यांचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होवो’, यासाठी प्रतिदिन प्रार्थना करा ! २. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उपक्रम किंवा आंदोलन होत असल्यास त्याच्या यशस्वितेसाठी उपास्यदेवतेला प्रार्थना करा.

मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या द्वितीय दिवशी (१७.६.२०२३ या दिवशी) दुसर्‍या सत्रामध्ये ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . .

प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त होईपर्यंत लढा चालूच ठेवू ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्यात यावे. भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणू शकत नाहीत.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्राचे बीज !

यंदाचे हिंदु राष्‍ट्र अधिवेशन हे या अनुषंगाने महत्त्वाचे आहे की, आज प्रथमच ‘हिंदु राष्‍ट्रा’च्‍या व्‍यापकतेत अधिक भर पडून हिंदुत्‍वनिष्‍ठांसमोर ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्रा’चे अत्‍यंत उदात्त ध्‍येय समोर ठेवण्‍यात आले आहे.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात एकत्र आलेली शक्ती हिंदु राष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यात कृतीशील होईल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘हिंदु राष्ट्राची संकल्पना ही आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृती आणि विश्वदर्शन यांचे नाव आहे. हिंदू ‘चराचरात ब्रह्म आहे’, असे मानत असल्यामुळे त्याचा उपभोग घेण्याची हिंदूंची संस्कृती नाही. त्यामुळे भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाले की, त्याद्वारे विश्वकल्याणाचे कार्य होईल, हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी देश-विदेशातील शेकडो हिंदुत्वनिष्ठांचे गोव्यात आगमन !

रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्थान येथे १६ ते २२ जून या कालावधीत होणार्‍या वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची म्हणजेच एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.