रामराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! –  प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’,‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच श्रीराम मंदिराच्या साक्षीने हिंदु राष्ट्र अर्थात् रामराज्याचा दिशेने वाटचाल चालू करण्यासाठी २४ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता शिवतीर्थ, कोर्ट चौक येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे,

छत्तीसगडमध्ये हलाल उत्पादनांवर बंदी घाला ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

एखाद्या स्वयंसेवी संघटनेने अवैध प्रमाणपत्रांद्वारे अशाप्रकारे कोट्यवधी रुपये गोळा करणे अत्यंत चुकीचे असून ते राष्ट्रासाठीही अत्यंत घातक आहे. छत्तीसगडमध्ये हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आले आहे, तेव्हा त्यांनी यावर त्वरित बंदी घालावी, अशी आमची मागणी आहे.

नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षकांसाठी प्रथमोपचार व्याख्यान !

ज्युपिटर हायस्कूल आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय खामला येथे १६ डिसेंबरला ‘प्रथमोपचार शिकण्याची आवश्यकता’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षकांसाठी व्याख्यान घेण्यात आले.

वैद्यकीय क्षेत्रात आध्यात्मिकतेवर आधारित ज्ञानाचा आधार घेऊन भारत नेतृत्व करील ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

तणावातून बाहेर पडण्यासाठी ताणाचे मूळ कारण सोधून त्यावर उपाययोजना काढून त्याला नामजपाची जोड दिल्यास आपण तणावमुक्त होऊ शकतो. हाच भाग आधुनिक वैद्य रुग्णांवर उपचार करतांना लक्षात ठेवून त्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करू शकतात.

कर्नाटकमध्ये ३५ सहस्र मंदिरांचे झाले आहे सरकारीकरण ! – अधिवक्ता किरण बेट्टदपूर

कर्नाटकात अनुमाने ३५ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. देवस्थाने लुटणे हा सरकारीकरण करण्याचा मूळ उद्देश आहे. सरकारीकरण झालेल्या सर्व मंदिरात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होतो, असा त्याचा अर्थ होतो, अशी टीका अधिवक्ता किरण बेट्टदपूर यांनी येथे आयोजित मंदिर परिषदेमध्ये सरकारवर केली.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राचीन मंदिराला निधी न देणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘श्री शिवराजेश्‍वर मंदिरा’साठी राज्य सरकारकडून प्रत्येक मासाला केवळ ५०० रुपये इतका तुटपुंजा भत्ता दिला जात आहे.

हिंदूंनी संघटित होऊन ज्याप्रमाणे श्रीराममंदिर बांधले, त्याचप्रमाणे अन्यत्र मंदिरे बांधणे का शक्य होणार नाही ? – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

बेंगळुरू येथे २ दिवसीय राज्यस्तरीय मंदिर परिषद ! मंदिरांचे ५०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित ! बेंगळुरू (कर्नाटक), १७ डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या संघटित शक्तीचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे २२ जानेवारीला अयोध्या येथे होत असलेले श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, हे आहे. वर्ष २०१६ मध्ये रायचूर येथे मिनारची दुरुस्ती करतांना तिथे मंदिराचा खांब आढळून आला. … Read more

धार्मिक स्थळे मद्य-मांस विक्री मुक्त करण्याविषयी सभागृहात विषय मांडू !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धार्मिक स्थळे मद्य-मांस विक्री मुक्त करा’ या मागणीचे निवेदन विविध आमदारांना देण्यात आले.

राजकीय पक्षांमध्ये ‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांची घुसखोरी ?

काँग्रेसने नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून नक्षली विचारांना प्रोत्साहन दिले. आता राहुल गांधी जी वक्तव्ये करत आहेत, त्यांवरून पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस अर्बन नक्षलवादाची विचारधारा…

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’शी चर्चा करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार भरतशेठ गोगावले समन्वय पहाणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांसंदर्भात मांडलेल्या सर्व मागण्यांविषयी सरकार सकारात्मक आहे, तसेच मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून बैठकांचे आयोजन करण्यात येईल.