हिमाचल प्रदेशातील मंदिरांना अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या विनियोगाचा प्रशासनाला मिळाला अधिकार !

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असतांना असा निर्णय घेणे हिंदूंना अपेक्षित नाही !

जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी हिंदू समाजाची क्षमा मागावी ! – विश्व हिंदु परिषदेची मागणी

अन्य धर्मीय उपासना स्थानातून हिंदु धर्मानुकुल उपक्रम पुरस्कृत होतात कसे ? सामाजिक सद्भावनेचा मक्ता केवळ हिंदूंनी घेतला आहे काय ? हिंदू समाज  मंदिरांचे काम सुरळीत चालू रहाण्यासाठी योगदान देत असतो…

‘अयोध्या मंडपम्’ कह्यात घेण्याचा द्रमुक सरकारचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाकडून रहित !

सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अयोध्या मंडपमचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम समाजाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. हिंदूंचे धार्मिक कार्यक्रम किंवा विवाह यांचे आयोजन करणारे सभागृह सरकार कसे कह्यात घेऊ शकते ?

केरळ उच्च न्यायालयाचे मंदिर सल्लागार समितीच्या अनास्थेवर ताशेरे !

याचा अर्थ जर न्यायालयाने नोंद घेतली नसती, तर हा अपप्रकार चालूच राहिला असता ! यासाठीच मंदिरांना सरकारीकरणातून मुक्त करून त्यांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवणे आवश्यक !

चेन्नई येथील ‘अयोध्या मंडपम्’ या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण !

तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे सरकार असल्याने तेथे अशा घटना घडल्यास आश्‍चर्य ते काय ? असे सरकार कधी चर्च आणि मशीद यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस करत नाही, हे लक्षात घ्या !

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्तींवरील वज्रलेप अल्पावधीतच निघण्यास प्रारंभ !

मंदिरांच्या सरकारीकरणाचेच हे दुष्परिणाम आहेत, हे लक्षात घ्या ! देवतांविषयी भाव नसणार्‍या सरकारी अधिकार्‍यांकडून मंदिराचे व्यवस्थापन काढून घेऊन ते भक्तांकडे सोपवणेच आवश्यक आहे, असेच हिंदु धर्मप्रेमींना वाटते !

तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे ३ भाविक घायाळ

व्यंकटेश्‍वर मंदिरात १२ एप्रिलच्या दुपारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यात ३ भाविक घायळ झाले.

भक्तांना मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी मत मांडण्याचा पूर्ण अधिकार ! – आंध्रप्रदेश उच्च न्यायालय

राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील श्री महाकाली अम्मावरी मंदिराच्या प्रस्तावित पुनर्निर्माणाच्या विरोधात येल्लंती रेणुका यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे परिवार देवतांच्या मंदिरांकडे अक्षम्य दुर्लक्ष ! – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती, श्रीक्षेत्र पंढरपूर

श्री विठ्ठल-रुक्मिणी यांसह सकल परिवार देवता याही भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या अशा अयोग्य स्थितीतील छायाचित्रांच्या माध्यमातून दुरवस्था आणि दुःस्थिती कशी आहे, ते कळेल. त्यामुळे सरकारीकरण झालेल्या मंदिर समितीचा भोंगळ कारभार सर्वांना कळेल !

मंदिरांचे सरकारीकरण आणि मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा योग्य दृष्टीकोन !

रंगराजन नरसिंहन यांच्या विरोधात श्री रंगनाथस्वामी मंदिराच्या विश्वस्तांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी २ फौजदारी गुन्हे नोंदवले होते.