जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी हिंदू समाजाची क्षमा मागावी ! – विश्व हिंदु परिषदेची मागणी

जेजुरीच्या देवस्थानाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याचे प्रकरण

जेजुरी देवस्थान

पुणे – अन्य धर्मीय उपासना स्थानातून हिंदु धर्मानुकुल उपक्रम पुरस्कृत होतात कसे ? सामाजिक सद्भावनेचा मक्ता केवळ हिंदूंनी घेतला आहे काय ? हिंदू समाज  मंदिरांचे काम सुरळीत चालू रहाण्यासाठी योगदान देत असतो, त्या जेजुरी गडाच्या मंदिरात सामान्य लोकांना जाण्यासाठी पायर्‍यांची व्यवस्थित उपलब्धता नाही. मागच्या बाजूला अतिमहनीय व्यक्तींसाठी व्यवस्था केलेली आहे, अशीच व्यवस्था सर्वसामान्य हिंदू भाविकांसाठी होणे अपेक्षित असतांना इफ्तार पार्टीचे सोंग कुणाच्या डोक्यातून निघाले ? त्यामुळे या पार्टीसाठी झालेला व्यय हा देवस्थानच्या विश्वस्तांकडून वसूल केला जावा आणि यापुढील काळात अशा इफ्तार पार्ट्या कुठल्याही देवस्थानात होऊ नयेत, याची धर्मादाय आयुक्तांनी काळजी घ्यावी, तसेच जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी मुसलमान समाजाच्या लोकांसाठी रोजाच्या निमित्ताने केलेल्या इफ्तार पार्टीचा निषेध करत जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी हिंदू समाजाची क्षमा मागावी, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या ‘विश्व हिंदु परिषद मठ मंदिर संपर्क समिती’चे संपर्क प्रमुख मनोहर ओक यांनी केली आहे.

याविषयीचे पत्र धर्मादाय कार्यालय येथे परिषदेच्या ‘मठ मंदिर संपर्क समिती’चे संपर्क प्रमुख मनोहर ओक, विश्व हिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री संजय मुरदाळे, प्रांत सहमंत्री अधिवक्ता सतिश गोरडे यांनी दिले आहे, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.