जेजुरीतील श्री क्षेत्र खंडोबा मंदिरातील ‘मार्तंड देवस्थान समिती’वर गावकर्‍यांची नियुक्ती करावी !

स्थानिकांना सोडून बाहेरगावच्या प्रतिनिधींची नेमणूक केल्याने गावकर्‍यांनी निषेध म्हणून आंदोलनास प्रारंभ केला आहे.

भगवान जगन्‍नाथ मंदिरातील मौल्‍यवान वस्‍तूंचा अपहार !

हिंदू निद्रिस्‍त असल्‍याने त्‍यांची शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांच्‍या लेखी काहीच किंमत नाही. ही सर्व स्‍थिती हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे किती आवश्‍यक आहे, हे दर्शवते.

मंदिरांचे विश्‍वस्‍त आणि पुजारी यांनी मंदिर-रक्षणार्थ खालील प्रकारे सहभागी झाल्‍यास मंदिरांतील पावित्र्याचे निश्‍चितच रक्षण होईल !

मंदिरांचे सरकारीकरण आणि सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांतील गैरप्रकार यांच्‍या विरोधात वैध मार्गाने सर्व स्‍तरांतील लोकांमध्‍ये जागृती करा !

मंदिरांच्या सरकारीकरणाचा इतिहास आणि उद्देश

भारतावरील विविध आक्रमणांच्या वेळी मंदिरे ही आक्रमकांच्या केंद्रस्थानी राहिलेली आहेत. कासीम, गझनी, घोरी, खिलजी, बाबर, औरंगजेब इत्यादी मोगल आक्रमकांनी अयोध्या, मथुरा, सोमनाथ, काशी, पुरी, भोजशाळा, अशा भारतभरातील सहस्रो ठिकाणच्या मंदिरांचा विध्वंस करून, मूर्तींची विटंबना करून तेथून धनाची, संपत्तीची लयलूट केली होती.

मंदिर सरकारीकरण : हिंदूंसाठी एक अभिशाप !

सरकारीकरण झालेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराच्या देवनिधीचा अपवापर होतांना दिसतो. एकदाचे सरकारच्या कह्यात मंदिर आले की, आपल्याला हवा तसा मंदिरांच्या देवनिधीचा वापर करायचा, हे नित्याचे झाले आहे.

हिंदु धर्माची आधारशिला असणारी मंदिरे !

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत ! सहस्रो वर्षांपासून सनातन हिंदु धर्माचे रक्षण, जतन आणि संवर्धन यांत मंदिरांची भूमिका अनन्‍यसाधारण आहे. ‘हिंदु’ श्रद्धाळू असतो.

सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील विविध घोटाळे !

देवधनाचा दुरुपयोग करणारे देव आणि धर्म विरोधीच !

मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या लढ्यांमधील काही महत्त्वपूर्ण यश !

महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाद्वारे मंदिरे आणि धार्मिक संस्था यांची होणारी लूट रोखली !

भारतभरातील लाखो मंदिरे सरकारी नियंत्रणात !

भारतभरातील अनुमाने ९ लाख मंदिरांपैकी ४ लाखांहून अधिक मंदिरे ही राज्य सरकारांच्या नियंत्रणाखाली आहेत.

पुरी (ओडिशा) येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचा खजिना उघडा ! – भाजप आणि काँग्रेस यांची मागणी

मंदिरे सरकारच्या कह्यात देणे, म्हणजे गाय कसायाच्या कह्यात देण्यासारखे आहे, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ? देशभरातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रभावी लढा उभारला पाहिजे !