मंदिरांचे विश्‍वस्‍त आणि पुजारी यांनी मंदिर-रक्षणार्थ खालील प्रकारे सहभागी झाल्‍यास मंदिरांतील पावित्र्याचे निश्‍चितच रक्षण होईल !

१. मंदिरांचे सरकारीकरण आणि सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांतील गैरप्रकार यांच्‍या विरोधात वैध मार्गाने सर्व स्‍तरांतील लोकांमध्‍ये जागृती करा !

२. मंदिरांशी संबंधित विद्यमान कायद्यांमुळे (उदा. ‘प्‍लेसेस ऑफ वर्शिप’, तसेच मंदिरांचे सरकारीकरण करणार्‍या कायद्यामुळे) होणार्‍या दुष्‍परिणामांचा अभ्‍यास करून ते दूर व्‍हावेत, यासाठी आवश्‍यक ते प्रयत्न करा !

३. प्रत्‍येक क्षेत्रातील मंदिरांचे विश्‍वस्‍त, पुजारी, भक्‍त, हितचिंतक आदींचे संघटन करा !

४. मंदिरांच्‍या धर्मपरंपरांचे पालन, प्रथांचे रक्षण, तसेच मंदिरांतील पावित्र्याचे रक्षण, स्‍वच्‍छता, नियमांचे पालन, शिस्‍त इत्‍यादींविषयी आग्रही रहा !

५. हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्‍यासाठी गुरुकुल, वेदपाठशाळा, तसेच गोशाळा चालू करून मंदिरांचा खर्‍या अर्थाने हिंदु समाजाला लाभ व्‍हावा, यासाठी प्रयत्न करा !

– (पू.) अधिवक्‍ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्‍च न्‍यायालय (२२.१.२०२३)