पुरी (ओडिशा) येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचा खजिना उघडा ! – भाजप आणि काँग्रेस यांची मागणी

खजिन्याची चावी गहाळ झाल्याचा राज्य सरकारचा दावा !

पुरी (ओडिशा) – येथील जगन्नाथ  मंदिरातील रत्नांचा खजिना ३९ वर्षांपासून बंद आहे. वर्ष १९८४ मध्ये तो शेवटचा उघडण्यात आला होता. या खजिन्यामध्ये १५० किलो सोने आणि २५८ किलो चांदी आहे. खजिना उघडावा आणि या संपत्तीचे लेखापरीक्षण करावे, अशी मागणी भाजप आणि काँग्रेस या पक्षांनी केली आहे. ओडिशा उच्च न्यायालयानेही  या प्रकरणात राज्य सरकारकडून १० जुलैपर्यंत उत्तर मागवले आहे. खजिना न उघडण्यामागे रत्न भंडाराच्या आतल्या खोलीची चावी मिळत नसल्याचे कारण राज्य सरकार सांगत आहे.

संपादकीय भूमिका 

  • सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! असे दायित्वशून्य उत्तर देणारे बिजू जनता दलाचे सरकार तात्काळ बरखास्त केले पाहिजे !
  • मंदिरे सरकारच्या कह्यात देणे, म्हणजे गाय कसायाच्या कह्यात देण्यासारखे आहे, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ? देशभरातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रभावी लढा उभारला पाहिजे !