गोवा : डेक बेड आणि कचरा विल्हेवाट शुल्कात पर्यटन खात्याकडून कपात

राज्य पर्यटन खात्याने आज एका सार्वजनिक सूचनेद्वारे शॅक व्यावसायिकांना दिलासा देणारी घोषणा केली. डेक बेड आणि कचरा विल्हेवाट यांच्या शुल्कात पर्यटन खात्याकडून अंदाजे ४० ते ५० टक्के कपात करण्यात आली आहे.

‘आझादीका अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत गोवा पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा विविध कला सादरीकरणाद्वारे सहभाग !

भारत शासनाच्या पुरातत्त्व सर्वेक्षण, गोवा विभागाच्या वतीने ‘आझादीका अमृत महोत्सवा’च्या अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांनी गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे सहभाग घेतला.

मध्यप्रदेशातील ‘निमाड अभ्युदय रूरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन’च्या संस्थापिका सुश्री भारती ठाकूर यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

मध्यप्रदेशातील ‘निमाड अभ्युदय रूरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन’च्या संस्थापिका सुश्री भारती ठाकूर यांनी रामनाथी, गोवा  येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार नवरात्रोत्सवात करण्यात आले देवींच्या कृपेसाठी होम !

हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि साधकांच्या आध्यात्मिक त्रासांचे निवारण व्हावे, यासाठी होमांच्या वेळी करण्यात आला संकल्प !

गोवा : ‘कीर्तीचक्र’ पुरस्कारप्राप्त  हुतात्मा नरेंद्र मयेकर यांच्या स्मारकावर ‘गोबी मंच्युरियन’ विक्रेत्याचे दुकान !

काही वर्षांपासून पोलीस रात्री आणि दिवसा चारचाकी वाहनाद्वारे सर्वत्र गस्त घालतात. त्यांना हे दिसले नाही का ? येथील नगरपालिका काय करत आहे ? जे गोवा फर्स्ट संघटनेला दिसते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला का दिसत नाही ?

गोवा : वर्ष २०१४ मध्ये कह्यात घेतलेला अमली पदार्थ पोलीस ठाण्यातील पुरावा कक्षातून गायब

याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हायला हवी ! कह्यात घेतलेला अमली पदार्थ भ्रष्टाचारी पोलीस पुन्हा अमली पदार्थ व्यावसायिकांना विकतात का ? याची कसून चौकशी व्हायला हवी !

व्यावसायिक शुल्क न भरणार्‍या मत्स्य व्यावसायिकांवर कारवाई करणार ! – निळकंठ हळर्णकर, मत्स्यव्यवसाय मंत्री, गोवा

कर न भरता व्यवसाय करण्यातून मत्स्यव्यावसायिकांची नीतीमत्ता किती ढासळली आहे, ते दिसून येते. समाजात प्रामाणिकपणा अपवादानेच दिसून येतो, याचे कारण त्यांना धर्मशिक्षण नसणे, हेच आहे !

गोव्यात नरकासुरदहन प्रथेतील गैरप्रकारांमुळे नागरिक त्रस्त

पूर्वी गोव्यात गावात १ याप्रमाणे मनुष्याच्या उंचीहून थोड्या अधिक उंचीच्या प्रतिमा बनवून त्या दहन केल्या जात असत. त्यानंतर मोठमोठ्या प्रतिमा बनवून त्यांच्या स्पर्धा घेण्याचा अपप्रकार चालू झाला. ज्यामध्ये श्रीकृष्णाऐवजी नरकासुरालाच अधिक महत्त्व दिले जाऊ लागले !

गोवा : मेरशी येथे १२ बांगलादेशी मुसलमान कह्यात !

या सर्वांना जुने गोवे पोलिसांकडे सुपुर्द केल्यावर जुने गोवे पोलिसांनी या लोकांना मायदेशी पाठवण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी विदेशी नोंदणी क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाकडे (एफआरआरओ) सुपुर्द केले.

आंतरभारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गोव्याचे पांडुरंग नाडकर्णी यांची निवड !

पांडुरंग नाडकर्णी शिक्षणक्षेत्रातील जाणकार असून त्यांनी गोव्यात कथामालेचे कार्य केले आहे. वर्ष १९७५ पासून ते आंतरभारतीशी जोडले गेले आहेत.