रामनाथी (गोवा) – मध्यप्रदेशातील ‘निमाड अभ्युदय रूरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन’च्या संस्थापिका सुश्री भारती ठाकूर यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी यांनी त्यांना आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म कार्य तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती सांगितली. सुश्री भारती ठाकूर यांच्या सोबत नाशिक येथील चित्रा देशपांडे, पणजी येथील शोभा सिनारी आणि त्यांचे इतर काही सहकारी उपस्थित होते. ‘सनातनचा आश्रम पाहून सनातन हिंदु धर्माच्या उज्ज्वल भविष्याविषयी खात्री वाटली. आश्रम पुष्कळ सुंदर आहे आणि येथील व्यवस्थापन उत्तम आहे’, असे मत सुश्री भारती ठाकूर यांनी व्यक्त केले.
‘निमाड अभ्युदय रूरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन’चे कार्य‘निमाड अभ्युदय’च्या वतीने गरीब मुलांना बालवाडी ते माध्यमिकपर्यंतचे शिक्षण विनामूल्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाते. मध्यप्रदेशच्या निमाड भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते. वनवासी विद्यार्थ्यांची निवास, भोजन आणि शिक्षण यांची विनामूल्य व्यवस्था केली जाते. मध्यप्रदेशच्या खरगोन, बडवानी आणि अलीराजपूर या जिल्ह्यांतील जवळजवळ ८० विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. या संस्थेच्या वतीने गोशाळा चालवली जाते. ‘निमाड अभ्युदय’ ने २५ एप्रिल २०१७ ला मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्राशी भागीदारी केली आहे. |