कराड येथील प्राचीन मंदिर परिसरातील कचरा त्‍वरित हटवण्‍यात यावा ! – स्‍थानिक भक्‍तांची मागणी

मंदिर परिसरात पडलेल्‍या कचर्‍याच्‍या घाणीचे साम्राज्‍य !

कराड, ९ ऑगस्‍ट (वार्ता.) – येथील वैकुंठधाम स्‍मशानभूमीच्‍या मागील बाजूस श्री काळभैरवाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिर परिसरात काही लोक प्‍लास्‍टिक, तसेच इतर कचरा मोठ्या प्रमाणात टाकतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून मंदिराचे पावित्र्य लोप पावत आहे, तसेच या ठिकाणी दारुड्यांचा अड्डा झाला असून दारू पिऊन कचरा करण्‍यात येत आहे. तरी कराड नगर परिषदेने या ठिकाणी सीसीटीव्‍ही कॅमेरा बसवून मंदिर परिसरात कचरा करणार्‍यांवर कारवाई करावी, तसेच सध्‍या मंदिर परिसरात पडलेला कचरा लवकरात लवकर हटवण्‍यात यावा, या मागणीचे निवेदन धर्मप्रेमी श्री. सुमित पवार, श्री. किरण तांबेरे यांच्‍या वतीने कराडचे उप-मुख्‍याधिकारी विशाखा पवार यांना देण्‍यात आले.

धर्मप्रेमींनी दिलेले निवेदन –

उप-मुख्‍याधिकार्‍यांनी निवेदनाची त्‍वरित नोंद घेत नगर परिषदेच्‍या आरोग्‍य अभियंत्‍यांना या निवेदनाच्‍या अनुषंगाने तात्‍काळ कार्यवाही करण्‍याविषयी लेखी कळवले. या वेळी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. सागर आमले, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अनिल कडणे, श्री. मदन सावंत, सनातन संस्‍थेचे सर्वश्री लक्ष्मण पवार, चिंतामणी पारखे आदी उपस्‍थित होते.

संपादकीय भूमिका

असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ? कि प्रशासन कर्तव्‍यचुकारपणा करत आहे, हे वरिष्‍ठ अधिकार्‍यांनी पहाणे आवश्‍यक !