पणजी, १० जुलै (वार्ता.) – सोनसोडो येथे प्रतिदिन कचरा साठवून ठेवणे, ही प्राथमिकदृष्ट्या एक आपत्कालीन स्थिती आहे. या समस्येचा स्फोट होण्यापूर्वी संबंधित यंत्रणांनी यावर तोडगा काढला पाहिजे, असा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिला आहे. मडगाव येथील सोनसोडो कचरा समस्येसंबंधी सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा निर्देश दिला.
न्यायालयाने पुढे म्हटले,
‘‘आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी यांनी सोनसोडो कचरा साठवून ठेवलेल्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणचे सर्वेक्षण करावे. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणी ११ जुलै या दिवशी होणार्या सुनावणीला आवश्यक उपाययोजना घेऊन स्वत: उपस्थित रहावे. सोनासोडो येथील समस्येचे निवारण होईपर्यंत मडगाव पालिका मंडळाने त्यांचा एक अभियंता तेथे नेमावा.’’
संपादकीय भूमिकाप्रशासनाला ही गोष्ट न्यायालयाने का सांगावी लागते ? |