बांगलादेशमध्ये धर्मांधांनी केली श्री गणेशमूर्तीची तोडफोड !
पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना कुणीच वाली नाही !
पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना कुणीच वाली नाही !
श्री गणेशाची विविध रूपे आहेत; परंतु त्यामुळे ‘श्री गणेशाला आपण हव्या त्या रूपात दाखवू शकतो’, असा त्याचा अर्थ होत नाही. बहुतांश चित्रकार, शिल्पकार आदी कलाकारांना ‘श्री गणेश विविध रूपांमध्ये दाखवता येतो’; म्हणून तो अधिक आवडतो. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे त्यांना हे ज्ञात नसते…
• अविघटनशील ‘थर्माेकोल’चा वापर टाळा !
• जुगार, मद्यपान आदी अपप्रकार टाळा !
श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूूषित शक्ती आकर्षून घेणारा आहे, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्ती प्रभाव पाडत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते.
आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति, लालबागचा राजा यांच्या सुंदर आणि सुबक अशा मूर्ती विक्रीसही ठेवल्या आहेत. या सर्व मूर्ती पर्यावरणपूरक आणि सर्वांना परवडणार्या असल्याने नागरिक अधिकाधिक खरेदीस पसंती देत आहेत.
श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने इतरांसह जावे. मूर्ती हातात घेणार्याने हिंदू वेशभूषा करावी, म्हणजे अंगरखा (सदरा)-धोतर किंवा अंगरखा-पायजमा परिधान करावा. त्याने डोक्यावर टोपीही घालावी.
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या सिद्धांतानुसार मूर्ती विज्ञानाप्रमाणे मूर्ती बनवल्यासच त्या मूर्तीमध्ये त्या देवतेचे तत्त्व आकृष्ट होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देऊ नये, तसेच त्यांची विक्री आणि विसर्जन यांवर बंदी घालण्याविषयीचे निवेदन तहसीलदार समीर यादव यांना २६ ऑगस्ट या दिवशी देण्यात आले.
गेली १० वर्षे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी असतांना पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत किती जणांवर कारवाई झाली ? हा प्रश्नच आहे. प्रशासन केवळ कायद्यांचे कागदी घोडे नाचवते; पण प्रत्यक्ष कारवाई झाल्याचे दिसून येत नाही !