पुणे येथील येरवडा कारागृहातील बंदीवानांनी शाडू मातीपासून साकारल्या श्री गणेशाच्या २५० मूर्ती

पुणे – येथील येरवडा कारागृहाच्या वतीने यंदा प्रथमच २५० शाडू मातीच्या मूर्ती बंदीवानांकडून सिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति, लालबागचा राजा यांच्या सुंदर आणि सुबक अशा मूर्ती विक्रीसही ठेवल्या आहेत. या सर्व मूर्ती पर्यावरणपूरक आणि सर्वांना परवडणार्‍या असल्याने नागरिक अधिकाधिक खरेदीस पसंती देत आहेत.

बंदीवानांना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, तसेच शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर नव्याने आयुष्याचा आरंभ करतांना आपल्या हातात काही तरी कला असावी, हाच या सर्व उपक्रमामागील उद्देश असल्याचे येरवडा कारागृहाच्या राणी भोसले यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

श्री गणेशाची मूर्ती सिद्ध करतांना ती भावपूर्ण आणि नामजप करत केल्यास मूर्ती बनवणार्‍यांना त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो !