पुण्यातील ५ मानाच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन ! ९ घंट्यांहून अधिक काळ चालली मिरवणूक !

पुण्यातील पाचवा केसरीवाडा येथील गणपतीच्या मिरवणुकीला ८ घंटे लागले. पाचवा केसरीवाडा गणेशमूर्तीचे सायंकाळी ६ वाजून ५९ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.

‘श्री गणपति पंचायतन देवस्थान ट्रस्ट’ येथे महिलांसाठी श्री गणपति अथर्वशीर्ष पठण !

अथर्वशीर्ष हे अत्यंत सोपे असून आपल्याला समजेल असे आहे. ईश्वरापर्यंत जाण्याचे अत्यंत सोपे साधन म्हणजे अथर्वशीर्ष होय !

‘डीजे’च्‍या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्‍यू !

डीजे’सारखी मोठा आवाज करणारी ध्‍वनीयंत्रणा वापरून आपणच उत्‍सवांचे पावित्र्य नष्‍ट करत आहोत, हेही मंडळांनी लक्षात घेतले पाहिजे. त्‍याही पुढे जाऊन अशातून झालेल्‍या तरुणाच्‍या मृत्‍यूचे दायित्‍व आता कोण घेणार ?

Ganesh Visarjan : श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम हौदांऐवजी पारंपरिक पद्धतीने विसर्जन करा !

गणेशमूर्ती विसर्जनावरून आगपाखड करणारे पर्यावरणप्रेमी नदीत विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले जाते, याविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत !

पूजेत वापरण्‍यात येणार्‍या विविध वस्‍तूंचे महत्त्व ! Ganeshotsav

कोणतेही शुभ कार्य असो वा कोणत्‍याही देवतेचे पूजन असो, त्‍यामध्‍ये सुपारी, नारळ (श्रीफळ), कलश, अक्षता, पंचारती आदी अनेक वस्‍तूंचा वापर करण्‍यात येतो. या वस्‍तू पूजनामध्‍ये का वापरण्‍यात येतात ? त्‍यांचे महत्त्व आणि कथा काय आहेत ? यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

अनंत चतुर्दशीचे व्रत Anant Chaturdashi

अनंत चतुर्दशी ! ‘गतवैभव प्राप्‍त करण्‍यासाठी श्री विष्‍णुदेवतेला अनुसरून केल्‍या जाणार्‍या या व्रतामध्‍ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. अशा या व्रताविषयीची माहिती येथे देत आहोत.

पुणे येथे ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या गर्दीत नृत्य करण्यासाठी मुले-मुली पाहिजेत’, अशा आशयाचे विज्ञापन प्रसिद्ध !

विसर्जन मिरवणुकीत पैसे घेऊन चित्रपट गीतांवर हिडीस नृत्य करणारे नव्हे, तर भजन आणि नामजप यांच्या गजरात भक्तीभावाने श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणारे भाविक आवश्यक असतात.

नेरूळ (नवी मुंबई) येथे बौद्ध कुटुंबाने श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्याने विरोध !

व्यक्तीस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य यांचा ढोल बडवणारे  अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपून बसतात ?

मिरज येथे काही गणेशोत्‍सव मंडळांकडून पौराणिक देखाव्‍यांचे सादरीकरण !

अवाढव्‍य आणि चित्रविचित्र मूर्ती, विद्युत् रोषणाईचा झगमगाट, तसेच ध्‍वनीप्रदूषणाला बगल देत काही गणेशोत्‍सव मंडळांनी पौराणिक देखाव्‍यांचे सादरीकरण करून नागरिकांची मने जिंकली आहेत.

पुणे येथील मानाचे गणपति सायंकाळी ६ नंतर विसर्जन मिरवणुकीमध्‍ये सहभागी होतील !

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्‍ट मंडळ, हुतात्‍मा बाबू गेणू गणपति मंडळ आणि श्री जिलब्‍या मारुति गणेश मंडळ ट्रस्‍ट ही पुणे येथील मानाची गणपति मंडळे सायंकाळी ६ वाजल्‍यानंतर विसर्जन मिरवणुकीमध्‍ये सहभागी होतील.