आज ‘अनंत चतुर्दशी’ आहे. त्या निमित्ताने…
‘गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून केल्या जाणार्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. अशा या व्रताविषयीची माहिती येथे देत आहोत.(Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)
१. अर्थ : अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो अन् चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती.
२. उद्देश : मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे, याकरता केले जाते.
३. व्रत करण्याची पद्धत : या व्रताची मुख्य देवता अनंत, म्हणजेच श्रीविष्णु असून शेषनाग आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी १४ वर्षांचा आहे. या व्रताचा प्रारंभ कुणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू रहाते. अनंताच्या पूजेत १४ गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते.
(साभार : सनातननिर्मित ‘सण साजरे करण्यामागील शास्त्र’ या ग्रंथातून)